शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गुजरातमध्ये काँग्रेस जिंकेल; राणेंचे भवितव्य आता साईबाबांच्या हाती - अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 03:06 IST

नारायण राणेंशी आता आमचा संबंध नाही. आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आता त्यांचे भवितव्य साईबाबांच्या हाती आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राणे यांच्याविषयी मत व्यक्त केले.

शिर्डी : नारायण राणेंशी आता आमचा संबंध नाही. आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आता त्यांचे भवितव्य साईबाबांच्या हाती आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राणे यांच्याविषयी मत व्यक्त केले.शनिवारी साईदर्शनासाठी आलेले चव्हाण म्हणाले, गुजरातमध्ये काँग्रेसला उत्तम वातावरण आहे. राहुल गांधींना चांगला प्रतिसाद मिळत आहे़ संसदेचे अधिवेशन पुढे ढकलून पंतप्रधान विधानसभेसाठी ५०पेक्षा अधिक सभा घेतात, यावरून भाजपाला घाम फुटल्याचे दिसते. देशातील अनेक पोटनिवडणुका, राज्यातील महापालिका, ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळत आहे.काँग्रेसला गुजरातमध्ये बहुमत मिळेल, असा दावा त्यांनी केला़ केंद्र व राज्य सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. सामान्य जनता, व्यापारी नाडला जात आहे़ शेतकºयांचे प्रश्न गंभीर झाले आहेत़ अत्यंत स्फोटक वातावरण असून काँग्रेस चांगली होती, असे लोकांना आता वाटत आहे. कर्जमाफीबाबत तारीख पे तारीख सुरू आहे. अगोदर सरकारने फसवे आकडे जाहीर केले होते़ आता सरकार प्रत्यक्षात आकडाही सांगू शकत नाही़ खड्डे बुजविण्याप्रमाणेच कर्जमाफीच्याही तारखांवर तारखा सुरू आहेत, असे चव्हाण म्हणाले. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के आदींची उपस्थिती होती़साखर कारखानदारीत विनाकारण हस्तक्षेपसाखर कारखानदारीत एफआरपीचा सत्तर-तीसचा फॉर्म्युला ठरला असतानाही सरकार विनाकारण हस्तक्षेप करून कारखानदारी अडचणीत आणत आहे. सरकारला यशवंतराव चव्हाणांची आठवण झाली, ही आनंदाची बाब आहे. मात्र सरकार चव्हाणांचे नाव घेत असेल तर त्यांना साजेसे काम करावे, असा टोमणा त्यांनी मारला़विधान परिषदेबाबत आज निर्णयविधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. रविवारी अंतिम निर्णय होईल़ या निवडणुकीत शिवसेनेने आमच्याबरोबर यायचे की नाही, ते त्यांनीच ठरवावे. शिवसेना मंत्रिमंडळात समृद्धी मार्गाला पाठिंबा देते व बाहेर विरोध करते ही दुटप्पी भूमिका आता जनतेच्या लक्षात येत असल्याचे ते म्हणाले़

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण