शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

काँग्रेस करणार मोदी सरकारचा पंचनामा

By admin | Updated: January 21, 2015 23:53 IST

हरीष रोग्ये : जनजागृतीसाठी आज मोर्चे, निदर्शने

कोल्हापूर : देशात सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला दिलेली आश्वासने न पाळता मोदी सरकार जनतेला वाऱ्यावर सोडून धनदांडगे व उद्योगपतींसाठीच काम करीत आहे. त्यांचा हा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस समितीच्यावतीने उद्या, बुधवारपासून पुढील आठवडाभर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते हरीष रोग्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली. या जनजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून उद्या दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्यावतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निदर्शने, मोर्चे, गावसभा घेऊन नरेंद्र मोदी सरकारचा कारभार कसा चालला आहे, त्यांनी दिलेली आश्वासनेकशी खोटी आहेत, हे जनतेला सांगणार आहोत, असे रोग्ये यांनी सांगितले. वाढती महागाई,भूमी अधिग्रहण कायदा आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती हे तीन विषय घेऊन जनजागृती मोहीम केली जाणार असल्याचे रोग्ये यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, महागाई कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी मोठी आश्वासने दिली. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याची घोषणा केली. कर्जबाजारी शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करणार, असे त्यांनी सांगितले; पण यातील एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केली नाही. शेतकरी आजही आहे त्याच स्थितीत आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, प्रदेश सरचिटणीस सुरेश कुऱ्हाडे, जिल्हा सरचिटणीस एस. के. माळी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पेट्रोल ३० रुपये लिटर पाहिजेपेट्रोल-डिझेलमध्ये कशी लूट सुरू आहे, याचे स्पष्टीकरण रोग्ये यांनी यावेळी दिले. कॉँग्रेस सरकार सत्तेवर होते तेव्हा आॅगस्ट २०१३ मध्ये क्रुड आॅईल प्रतिबॅरल ११५ डॉलर होते. त्यावेळी डिझेल ५४ रुपये प्रतिलिटर व पेट्रोल ७४ रुपये प्रतिलिटर होते. आज क्रुड आॅईल प्रतिबॅरल ४७ डॉलर आहे आणि डिझेल ५२ रुपये तर पेट्रोल ६८ रुपये प्रतिलिटर आहे. एकीकडे क्रुडचे दर साठ टक्क्यांनी उतरले असताना डिझेल, पेट्रोलचे दर मात्र उतरले नाहीत. डिझेल २० रुपये लिटर, तर पेट्रोल ३० रुपये लिटर पाहिजे होते. मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर कमी केलेले नाहीत. विमान कंपन्यांना सरकार ५१ रुपये प्रतिलिटरप्रमाणे पेट्रोल पुरवठा करते; तर सर्वसामान्य जनतेला आजही ते ६८ रुपये लिटरप्रमाणे ते दिले जाते. मग सरकार कोणासाठी काम करतेय, हे स्पष्ट झाल्याचे हरीश रोग्ये यांनी सांगितले. पापाचे धनी आता झाले जागेशेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्याचा प्रयत्न कॉँग्रेस सरकारने केला. तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या नेत्यांनी आंदोलने केली. आम्ही कापसाला ५५०० रुपये, सोयाबीनला ४५०० रुपये, तर उसाला २७५० रुपये भाव दिला. आज भाजप सरकार तो अनुक्रमे ४००० रुपये, ३००० रुपये व २६०० रुपये द्यायला लागले. तरीही शेतकऱ्यांचे नेते गप्प बसले आहेत. पापाचे धनी झालेले हेच नेते आता गप्प असल्याची टीका रोग्ये यांनी यावेळी केली.