शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:48 IST

Congress News: ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न आहे, असा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Congress News: ईव्हीएम संदर्भात तुमची भूमिका स्वच्छ आहे, तर निकालासाठी २० दिवस थांबायची वेळ का आली आहे? राज्यातील २६८ पैकी १७५ जागा भाजपाच्या येथील हे कशाच्या आधारावर बोलतात? तुम्ही कोणते दिवे लावले, ज्याने इतक्या जागा येईल? लाडक्या बहिणीच्या नावाचा वापर करून निवडून आले. ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न आहे. जर भाजपाच्या १७५ जागा आल्या तर भाजपाने बेईमानी करुन, ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल, असा मोठा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. 

नगरपालिका निवडणुकीत प्रशासनाचा गोंधळ दिसून आला आहे. निवडणूक ईव्हीएम मशिनच्या स्ट्राँग रुमबाहेर अनेक ठिकाणी गडबड आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जॅमर लावा. रुमबाहेर मोठी स्क्रीन लावा,  उमेदवाराला लाइव्हचे एक्सेस द्या. पण हे करायला निवडणूक आयोग तयार नाही, म्हणजे सरकारचा १७५ जागा मशिनच्या आधारावर जिंकणे हे टार्गेट आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. 

मतचोरी आणि मशीनच्या आधारावर सरकार बोलत आहे ना? 

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये इतक्या तक्रारी आल्या आहे. अनेक ठिकाणी मारामारीच्या घटना घडल्या, मोठ्या प्रमाणावर पैसे वाटल्याचे पुरावे तर सत्ताधारी आमदारांनी दिले, तरी कोणतीही कारवाई झालेली नाही. आता जिथे ईव्हीएम ठेवण्यात आले तिथे सीसीटीव्ही लाईव्ह फुटेज देत नाही, तिथे मोठ्या स्क्रीन लावण्यात आलेले नाही, जिथे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या त्या खोलीच्या बाहेर जॅमेर लावण्यात आलेले नाही. यातून मतचोरी होणार हे स्पष्ट दिसत आहे. निवडणुका झाल्या आणि २६८ जागांपैकी १७५ जागा भाजपा जिंकणार हे कशाच्या आधारावर भाजपाचे नेते बोलत आहेत? मतचोरी आणि मशीनच्या आधारावर सरकार बोलत आहे ना? अशी विचारणा विजय वडेट्टीवारी यांनी केली. 

दरम्यान, नागपूर इथे हिवाळी अधिवेशन हे तीन आठवडे चालणे अपेक्षित होते. या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळते याकडे लक्ष असते. पण आता निवडणुकीचे कारण दाखवून अधिवेशन सात दिवसात गुंडाळण्यात येणार आहे. एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे दुसरीकडे आचारसंहितेचे कारण दाखवून सरकार या अधिवेशनात कोणतीही घोषणा करू शकत नाही, त्यामुळे या अधिवेशनात विदर्भाच्या तोंडाला पानचे पुसली जाणार, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP will win fraudulently if they get 175 seats: Congress

Web Summary : Congress leader Vijay Wadettiwar alleges BJP aims to win 175 seats through EVM manipulation and vote theft. He questions the lack of transparency in EVM storage and criticizes the shortened winter session, claiming Vidarbha will be ignored. He also alleges the ruling party leaders have proofs of money distribution during elections, but no actions were taken.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेस