शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

‘तरुण भारत’वरून काँग्रेसने भाजपाला घेरले

By admin | Updated: February 27, 2016 04:53 IST

भाजपाने उकरून काढलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणाला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देताना काँग्रेसने तरुण भारत या दैनिकाचा मुद्दा उपस्थित केला आहे. भाजपाने हे वृत्तपत्र चालविणाऱ्या

- शीलेश शर्मा,  नवी दिल्ली भाजपाने उकरून काढलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणाला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देताना काँग्रेसने तरुण भारत या दैनिकाचा मुद्दा उपस्थित केला आहे. भाजपाने हे वृत्तपत्र चालविणाऱ्या श्री मल्टी मीडिया व्हिजन लिमिटेडला (एसएमव्हीएल) कर्ज दिले आहे. त्यामुळे आता अर्थमंत्री अरुण जेटली या भाजपावर कारवाई करणार का, असा सवाल काँग्रेसने राज्यसभेत केला.काँग्रेसने महाराष्ट्रातील घोटाळ्यांचा मुद्दा उपस्थित करीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नफा कमावणाऱ्या व्यावसायिक कंपनीचे कार्यालय भाजपाच्या कार्यालयातून कसे चालविले जात आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि रणदीप सूरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केला. या दोन नेत्यांनी संबंधित दस्तऐवज सादर करीत हे कायद्याचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट केले. केशव कुंजनेसुद्धा सदर कंपनीला २० लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. रा.स्व. संघाचे दिल्लीतील कार्यालय असलेले केशवकुंज ते हेच काय? याचे उत्तर देशाला दिले जावे, अशी मागणी त्यांनी केली.२०१२-१३च्या आयकर रिटर्नमध्ये भाजपाने तरुण भारतला दिलेले कर्ज या वृत्तपत्राकडे पैसा नसल्यामुळे परत होऊ शकणार नाही, असे स्पष्ट केले होते. एसएमव्हीएल ही कंपनी तरुण भारतचे प्रकाशन करते. व्यावसायिक हित आणि पदाची गोपनीयता यांच्यात संघर्ष उभा ठाकत असेल तर कारवाई व्हायला नको काय, असा सवालही या दोन नेत्यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केला. विनोद तावडे हे मंत्री असूनही अनेक कंपन्यांचे संचालक बनले आहेत. हे कसे काय? तरुण भारतचे संपादक दिलीप करंबेळकर आणि तावडे यांच्यांत कोणते व्यावसायिक संबंध आहेत,हे मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट करावे. ज्या २४ नावांची शिफारस करण्यात आली त्यात समावेश नसतानाही करंबेळकर यांना मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष बनविण्यात आले. तावडेंनी मुख्यमंत्र्यांचा सल्ला न घेताच अन्य नावे हटवत करंबेळकर यांना अध्यक्ष कसे बनवले यामागचे रहस्य उघड व्हावे, अशीही मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.गडकरींचा मित्तल यांच्याशी कोणता संबंध?केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे श्री मल्टी मीडिया व्हिजन लिमिटेडमध्ये रवींद्र बोरटकर यांच्यासोबत भागभांडलदार आहेत. त्यांनीही ही माहिती आयोगापासून लपून ठेवली आहे. प्रतिज्ञापत्रात या गुंतवणुकीचा उल्लेख नाही. राम मित्तल यांच्याशी गडकरी यांचा काय संबंध आहे, याचाही खुलासा केला जावा. कारण मित्तल यांचा एका घोटाळ्यात काळ्या यादीत समावेश असतानाही त्यांना महामार्ग प्राधिकरणात (एनएचएआय) मोठे कंत्राट दिले जात आहे. मित्तल यांनी कोणाच्या इशाऱ्यावरून एसएमव्हीएलला १५ लाखांचे कर्ज दिले आहे. मोदी, शहा, जेटली आणि गडकरी यांनी सर्व आरोपांचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही या नेत्यांनी केली.