मुंंबई : राष्ट्रवादीने साथ सोडली असली तरी मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या रूपाने काँग्रेसला नवा साथी मिळाला आहे. सपाला ६ ते ८ जागा देण्यात येतील, अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सपाचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी यांच्याशी चर्चा केली. जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींची मोट बांधण्याच्या उद्देशानेच सपाशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आ. आझमी म्हणाले, भिवंडी पूर्व, मानखुर्द शिवाजीनगर, कुर्ला, उद्गीर, औरंगाबाद मध्य यासह आठ जागा आम्हाला आघाडीमध्ये मिळतील, असा माझा विश्वास आहे. सपाला आघाडीत सहा जागा देण्यात येतील, असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. सपाला सोबत घेतल्याने विशेषत: त्यांना मानणारा मुस्लीम मतदार काँग्रेससोबत येईल, असा काँग्रेसचा दृष्टिकोन आहे. प्रा. जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टीदेखील काँग्रेससोबत आहे.मात्र, सपासोबत आघाडी करण्याच्या निर्णयास विरोध दर्शवित काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आज मुंबई काँग्रेसच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. (विशेष प्रतिनिधी)
काँग्रेस-सपाची नवी आघाडी
By admin | Updated: September 27, 2014 05:47 IST