शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला 'हात' देण्याचे काँग्रेसचे संकेत

By admin | Updated: February 24, 2017 11:39 IST

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा दोघे मोठे पक्ष ठरले असले तरी, जनतेने कुठल्याही एकापक्षाला बहुमताचा स्पष्ट कौल दिलेला नाही.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 24 - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा दोघे मोठे पक्ष ठरले असले तरी, जनतेने कुठल्याही एकापक्षाला बहुमताचा स्पष्ट कौल दिलेला नाही. मुंबई महापालिकेची स्थिती त्रिशंकू आहे. सत्ता स्थापनेसाठी कुठल्याही दोन पक्षांना एकत्र येणे आवश्यक आहे. शिवसेना आणि भाजपामध्ये वैचारीक समानता असली तरी, सध्याची बदललेली समीकरणे लक्षात घेता दोन्ही पक्षांना परस्परांसोबत युती करण्याची अजिबात इच्छा राहिलेली नाही. 
 
शिवसेना भाजपा एकत्र आले तर, यावेळी शिवसेनेला संख्याबळानुसार भाजपाला निम्मा वाटा द्यावा लागेल. जे शिवसेनेला मान्य नाही. अशावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेण्याचा पर्याय शिवसेनेसमोर आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मोठी वैचारीक दरी असली तरी, दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची  शक्यता फेटाळलेली नाही. 
 
मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत त्यांना तुम्ही शिवसेनेची सत्ता स्थापनेची अडचण सोडवणार का  ? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी सध्या आमची वाट पाहण्याची रणनिती आहे. महापालिकेत काँग्रेसने काय भूमिका घ्यायची याचा निर्णय पक्षनेतृत्व घेईल असे उत्तर दिले. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेला काँग्रेसची साथ मिळू शकते. 
 
यापूर्वी शिवसेनेने दोनवेळा भाजपा प्रणीत राओल आघाडीमध्ये सहभागी असूनही काँग्रेसने निवडलेले राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना मतदान केले होते. त्यामुळे काँग्रेस त्या पाठिंब्याची परतफेड यावेळी करु शकते. भाजपाच्या हाती महापालिकेची सत्ता देऊन भाजपला अधिक बळकट करण्यापेक्षा त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे हित जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसचा हात शिवसेनेला मिळू शकतो. शिवसेना काँग्रेससोबत जाणार नाही असे भाजपाच्या नेत्यांना वाटत असले तरी, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा आणि पीडीपी एकत्र येऊ शकतात मग मुंबईत काँग्रेस आणि शिवसेना का नाही ? असा प्रश्न काही शिवसैनिकांनी विचारला आहे.