शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Prithviraj Chavan : "अब्दुल सत्तारांनाच आता शिक्षणमंत्री करतील"; पृथ्वीराज चव्हाणांचा टीईटी घोटाळ्यावरून खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 12:42 IST

Congress Prithviraj Chavan Slams Abdul Sattar : शिंदे गटातील बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे या टीईटी घोटाळ्याच्या यादीत दिसल्याने खळबळ उडाली आहे.

टीईटी घोटाळा उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. हजारो शिक्षकांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. ज्यांना नोकरी मिळालेली नाही, त्या उमेदवारांना पुन्हा कधीच टीईटी देता येणार नाही. अशातच शिवसेनेचे शिंदे गटातील बंडखोर नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन मुलींची नावे या टीईटी घोटाळ्याच्या यादीत दिसल्याने खळबळ उडाली आहे. यादीतील नावावर अब्दुल सत्तार यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. टीईटीची ती यादी फेक आहे. माझा किंवा माझ्या कुटुंबाचा याच्याशी काही संबंध नाही. जे यात दोषी असतील त्यांना फासावर लटकवा, असे सत्तार म्हणाले आहेत. यावरून आता काँग्रेसने सत्तार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Congress Prithviraj Chavan) यांनी "अब्दुल सत्तारांनाच आता शिक्षणमंत्री करतील" असं म्हणत टीईटी घोटाळ्यावरून खोचक टोला लगावला आहे. "टीईटी घोटाळ्यावर आम्ही विधानसभेत आवाज उठवू. सरकार त्यांचंच आहे. आता अब्दुल सत्तार यांनाच ते शिक्षण मंत्री करतील. मग सगळाच निकाल लागेल. राज्यात अस्थिरता असेल तर अशा गोष्टी बघता येत नाही. घोटाळे बघायला वेळ नसतो. सरकारमध्ये मंत्री कोण होणार? कुणाला कोणते खाते मिळणार? तेच लोक बघतात. त्यामुळे बाकीच्या गोष्टी लपून जातात" असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. कोल्हापुरात कोल्हापुरात पत्रकार परिषदेत त्यांनी असं म्हटलं आहे. 

सध्या सोशल मीडियावर एक यादी व्हायरल झाली आहे. यामध्ये हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी दोन नावे आहेत. या नावांवर देखील सत्तार यांनी आक्षेप घेतला आहे. मी अब्दुल सत्तार आहे त्यांच्या नावात पुढे शेख लावले आहे. या नावांतही तफावत असल्याच अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. 

"त्या परीक्षेत जर माझ्या मुली पात्र झाल्या असतील तर त्याचे प्रमाणपत्र अद्याप त्यांना मिळालेले नाही. किंवा ते प्रमाणपत्र त्यांनी कुठे दाखवून नोकरी मिळवलेली नाही. त्या २०१५ मध्येच नोकरीला लागलेल्या आहेत. त्यांनी टीईटीच्या प्रमाण पत्राने नोकरी मिळवलेली नाही. माझ्या मुलीचे लग्न झालेले आहे. शिक्षण विभागात चौकशी केल्यास सर्व सत्य बाहेर येईल" असंही सत्तार म्हणाले.  

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणAbdul Sattarअब्दुल सत्तारPoliticsराजकारण