शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या संपाला काँग्रेस-राष्ट्रवादीची फूस- शायना एनसी

By admin | Updated: June 10, 2017 16:00 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकऱ्यांना फूस देऊन आंदोलन करायला भाग पाडते आहे, असा आरोप भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

पिंपरी, दि. 10- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपा सरकारने तोडगा काढूनही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्या प्रश्नांवर राजकारण खेळण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकऱ्यांना फूस देऊन आंदोलन करायला भाग पाडते आहे, असा आरोप भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी केला आहे. शेतकरी,कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, अशी भाजपाची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजप सरकारला सत्तेत येऊन तीन वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने भाजपा प्रवक्ते विविध शहरांमध्ये विकासकामांची माहिती देत आहेत. याचाच एक भाग म्हणून पिंपरीत प्रवकत्या शायना एन सी आणि प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या कार्याची महिती दिली. 
शेतकऱ्यांना अनुदान देणं, शेतीमालाला भाववाढ हे तात्पुरते उपाय आहेत. अशीच आश्वासनं आधीच्या सरकारनेसुद्धा दिली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी भाजपा अडीच वर्षांपासून काम करतं आहे, असंही पत्रकार परिषदे दरम्यान शायना एन सी म्हणाल्या आहेत. 
 
भाजपाच्या काळात शेतकऱ्यांना अच्छेदिन
भाजपाच्या आधी जे पक्ष सत्तेत होते, त्यांनी शेतकऱ्यांना फक्त आश्वासनं दिली. भाजपा सत्तेत येऊन तीन वर्षे झाली. या काळात शेतकऱ्यांच्या  शेतीमालाला योग्य हमी भाव दिल्याचं दिसून येतं आहे. मागील आकडेवारी पाहिल्यास सर्वाधिक तूर भाजपाच्या काळात खरेदी केली. खऱ्या अर्थाने भाजपाच्या काळात शेतकऱ्यांना अच्छे दिन आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात युरिया खत शेतकऱ्यांना काळ्या बाजाराने घ्यावे लागत होते. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारच्या कारकिर्दीत ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार चर्चेस तयार आहे. शेतकऱ्यांच्या कृती समितीत शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणारे जे लोक आहेत, त्यांच्यातच मतभेद असल्याने चर्चा होत नाही. ही शोकांतिका आहे. असं भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नमूद केलं.