शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोठे नेते भाजपाच्या संपर्कात- गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 02:25 IST

काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत.

नाशिक : काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या वाढदिवसाला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याची इच्छा होती. मात्र, कामाच्या व्यस्ततेमुळे दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या, असे त्यांनी सांगितले.जलसंपदा विभागाच्या एका कार्यक्रमात गिरीश महाजन यांच्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी स्तुतिसुमने उधळली. २५ वर्षे आपण मंत्री होतो, मात्र इतक्या वर्षात जलसंपदासाठी इतका निधी पश्चिम महाराष्टÑासाठी आला नाही, असे त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर महाजन म्हणाले की, पतंगराव कदम काय किंवा गणपतराव देशमुख काय, यांनी जे सत्य आहे, तेच सांगितले.नारायण राणे, पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपात आल्यास नरेंद्र मोदीच्या काँग्रेसमुक्त भारताला ती मदतच होणार आहे. या नेत्यांचे भाजपात स्वागतच आहे, असे ते म्हणाले.खडसेंची नाराजी व्यक्तिगतखडसे हे सरकारवर टीका करीत नाहीत. ती त्यांची व्यक्तिगत टीका असते. काहीवेळा ते शेरो-शायरीतून टीका करतात. नुकतेच खडसे यांनी आपण समुद्रात बुडणार नाही, तर त्यावर स्वार होऊ, असे म्हटले होते. त्यावर मिश्किलपणे आपलाही एक शेर आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगत ‘मै जब समंदर मै डूबने लगता हूँ, तो दरीया मुझे उछाल देता है’ असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

टॅग्स :BJPभाजपा