शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणारच; समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:50 IST

सद्य:स्थितीतील राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजपाविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे झाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेत फारसा फरक नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

नागपूर : सद्य:स्थितीतील राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजपाविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे झाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेत फारसा फरक नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात तीनदा भेट झाली आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसची आघाडी होणारच, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.पटेल यांनी ‘लोकमत’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी संपादकीय सहकाºयांशी चर्चेदरम्यान त्यांनी विविध विषयांवर स्पष्ट मते मांडली. सत्तास्थापनेनंतर सुरुवातीची तीन वर्षे महागाई कमी करण्यासाठी भाजपासमोर अतिशय पोषक वातावरण होते. मात्र ते कमी करण्यात अपयशी ठरले. वर्तमान राजकीय परिस्थितीत विरोधी पक्षांनी भाजपाला थांबविण्यासाठी सर्व मतभेद विसरून एकत्र येणे आवश्यक आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व नेमके कोण करेल हे सांगणे कठीण आहे. मात्र शरद पवार हे विरोधी पक्षांसाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावू शकतात, असे पटेल म्हणाले. २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या जागा निश्चितपणे मोठ्या प्रमाणात कमी होतील. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा यांसारख्या राज्यांत तर विरोधकांनी एकत्र येणे भाजपासमोर अनेक आव्हाने उभे करणारे राहणार आहे, असे मत पटेल यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेल