मुंबई : प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह पक्षाच्या काही नेत्यांनी सोमवारी मुंबई सीएसटी ते ठाणो असा विनातिकीट लोकल प्रवास करून रेल्वे भाडेवाढीचा निषेध केला. आता भाडेवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते बुधवारी राज्यभर रेल्वे रोको आंदोलन करणार आहेत. तर भाजपाच्या एका केंद्रीय मंत्र्यासह मुंबईतून शिवसेना-भाजपाचे शिष्टमंडळ मंगळवारी भाडेवाढीच्या विरोधात रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहे.
ठाकरे यांच्यासह अ. भा. काँग्रेसचे सहप्रभारी बालाराम बच्चन, मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर, मंत्री नसीम खान, वर्षा गायकवाड, खा. हुसेन दलवाई, माजी खासदार एकनाथ गायकवाड, आ. कृपाशंकरसिंह, हरिभाऊ राठोड, राजहंससिंह, माजी मंत्री अनिस अहमद आदींच्या उपस्थितीत सीएसटी येथे निदर्शने करण्यात आली. त्यानंतर ठाकरे, दलवाई यांनी निषेध म्हणून कार्यकत्र्यासह विनातिकीट रेल्वेप्रवास सुरू केला. दरम्यान, भाडे वाढीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल झाल्या आहेत.
आंदोलनकत्र्या नेत्यांसाठी लोकलचा प्रवास त्रसदायकच होता. सीएसटी ते ठाणो या स्लो लोकलमध्ये खूप गर्दी होती. त्यात कार्यकत्र्याची भर पडली. नेते घामाघूम झाले. मधेच सूचना आली की फस्र्ट क्लासच्या डब्यातून जाऊ. मग कुणी म्हणाले नाही, नाही मेसेज चांगला जाणार नाही़ मग सगळे जनरल डब्यातूनच गेले.
प़ बंगाल विधानसभेत ठराव
पश्चिम बंगाल विधानसभेने आज सोमवारी ठराव पारित करून रेल्वे भाडेवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली़ रेल्वे भाडय़ातील आतार्पयतची सर्वात मोठी वाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या या निर्णयाची या ठरावाद्वारे निंदा करण्यात आली आहे.