शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
8
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
9
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
10
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
11
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
12
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
13
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
14
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
15
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
16
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
17
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
18
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
19
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
20
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ

काँग्रेसने बाजी मारली!

By admin | Updated: December 9, 2015 01:23 IST

काँग्रेसने हिवाळी अधिवेशनावर जबरदस्त मोर्चा काढून पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये जान आणली आणि मोर्चा यशस्वी करीत

अतुल कुलकर्णी,  नागपूरकाँग्रेसने हिवाळी अधिवेशनावर जबरदस्त मोर्चा काढून पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये जान आणली आणि मोर्चा यशस्वी करीत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा प्रदेश काँग्रेसवर आपली पकड मजबूत केली आहे. मागच्या अधिवेशनावर काढलेला मोर्चा फसल्याने त्याच्याशी आपला संबंध नाही म्हणणारे देखील आज हिरीरीने आपण कसे नियोजन केले हे सांगण्यात मशगुल झाले होते हे विशेष! मोर्चाला किती लोक हजर होते हे सांगण्यासाठी पोलीसही टाळाटाळ करत होते. मात्र खाजगीत किमान लाख, सव्वा लाख लोक आले होते असे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. खा. अशोक चव्हाणांनी दीड लाखावर गर्दी गेल्याचे सांगितले. किती गर्दी होती हा मुद्दाच आजच्या मोर्चाने संपवला असून या मोर्चाने एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. खा. अशोक चव्हाण यांनी अत्यंत बारकाईने केलेले नियोजन, प्रत्येकाला वाटून दिलेली कामे आणि त्यावर ठेवले गेलेले नियंत्रण यामुळे राज्यपातळीवर या मोर्चाने एकाचवेळी अनेक संदेश देण्याचे काम केले. अशोक चव्हाण यांनी संघटनेवर मजबूत पकड निर्माण केली, सरकारविषयी जनतेच्या मनात कटुताही निर्माण केली आणि मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये व पक्षात जान आणण्याचेही काम या मोर्चाने केले. पक्षाचे राज्यातले सगळे ज्येष्ठ नेते आजच्या मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आले. पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांच्यासह विदर्भ, मराठवाडा, प. महाराष्ट्र अशा सगळ्या भागातले नेते, आमदार या निमित्ताने एकत्र आले.विधीमंडळाचे कामकाज कसे बंद करायचे, त्यासाठी काय नियोजन करायच२२२े, यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचीही पडद्याआड मदत घेतली. पडद्याआड केलेले नियोजन कामी आले आणि आज काँग्रेसच्या बरोबरीने राष्ट्रवादीचे आमदारही वेलमध्ये घोषणा देत उतरले. राष्ट्रवादी आमदारांच्या हातातही फलक होते. काँग्रेस राष्ट्रवादीतील कटुताही यानिमित्ताने कमी झालेली पहायला मिळाली.> विधानसभेत गदारोळ सुरू होता. आम्हाला चर्चा नकोच आहे, कर्जमाफीची घोषणा करा, असे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील सांगत होते मात्र त्याचवेळी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील बोलायला उभे राहिले. सरकारने प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चा सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे तात्काळ उभे राहिले आणि आमची चर्चा करण्याची तयारी आहे, सुरू करा चर्चा अशी विनंती अध्यक्षांना केली. त्यावर शेजारीच बसलेल्या अजित पवारांनी तात्काळ जयंत पाटील यांना चर्चा मागायची नाही असे ठरले आहे, शांत बसा, असे सांगितले. काँग्रेसच्या कर्जमाफी मोर्चाचे महत्त्व कमी करण्यासाठीच जयंत पाटील यांनी हा विषय काढल्याची चर्चा आज विधीमंडळ परिसरात होती.> नागपूरच्या गुलाबी थंडीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आपापसातील अनोख्या हातमिळवणीची चर्चा रंगली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. ८ तारखेला काँग्रेसचा मोर्चा निघेल. त्यासाठी राष्ट्रवादीने सभागृहाचे कामकाज बंद पाडण्यासाठी सहकार्य करायचे आणि १० तारखेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी त्यांच्या पक्षाच्या आमदारांना जायचे असल्याने त्यादिवशीचे कामकाज कसे गुंडाळता येईल यासाठी राष्ट्रवादीने त्यांना मदत करायची. या हातमिळवणीची चर्चा आज दिवसभर विधीमंडळ परिसरात रंगली होती. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले गेले. मात्र हे करताना सत्ताधारी पक्षाने देखील जेवढे कामकाज होते तेवढे सगळे उरकून घेतले. आता १० तारखेला राष्ट्रवादीची नेते मंडळी नागपूरबाहेर जातील.