शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सतेज पाटील यांनी वेधलं लक्ष, मंत्री मकरंद पाटील म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:14 IST

यावर खुलासा करताना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन स्तरावरून विविध विभागांमार्फत उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.

कोल्हापूर : राज्यात सावकारी कर्ज, बँकांचे कर्ज, नापिकी, अतिवृष्टी आदी कारणांमुळे जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत एकूण ७८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय? शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी श्वेतपत्रिका जाहीर करून कोणत्या उपाययोजना केल्या आहेत? असे प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी उपस्थित केले.सावकारी कर्ज, इतर बँकांचे कर्ज, नापिकी आणि अतिवृष्टीमुळे या आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये विदर्भातील नागपूर विभागात २९६, तर मराठवाडा विभागातील २१२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय? चौकशीच्या अनुषंगाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली? तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी श्वेतपत्रिका जाहीर करून कोणत्या उपाययोजना केल्या आहेत? असे प्रश्न सतेज पाटील यांनी उपस्थित केले.यावर खुलासा करताना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन स्तरावरून विविध विभागांमार्फत उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. आत्महत्या रोखण्याकरिता शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणे, सिंचन सुविधांमध्ये वाढ करणे, पिकांची, शेतजमिनीची आणि पशुधनाची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना वाटप करणे, या बाबी जिल्हास्तरावर राबविण्यात येत असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.