शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
4
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
5
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
6
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
7
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
8
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
9
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
10
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
11
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
12
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
13
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
14
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
15
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
16
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
17
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
18
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
19
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
20
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!

'या' चुकीमुळे गोव्यात काँग्रेस बसणार विरोधी बाकांवर

By admin | Updated: March 14, 2017 13:02 IST

गोवा विधानसभेत संख्याबळाच्या आधारावर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, काँग्रेसने केलेल्या एक छोटाशा चूकीची किंमत त्यांना विरोधी बाकावर बसून चुकवावी लागणार आहे.

 ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. 14 - गोवा विधानसभेत संख्याबळाच्या आधारावर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, काँग्रेसने केलेल्या एक छोटाशा चूकीची किंमत त्यांना विरोधी बाकावर बसून चुकवावी लागणार आहे.  गोव्यात काँग्रेसने शेवटच्या मिनिटाला गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांच्या विरोधात उमेदवार उतरवण्याचा घेतलेला निर्णय त्यांना महाग पडला. 
 
सुरुवातीला काँग्रेसने दोन जागांवर गोवा फॉरवर्ड पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षामध्ये झालेल्या छुप्या समझोत्यानुसार फातोर्डा विधानसभेच्या जागेवर काँग्रेस विजय सरदेसाईंचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला होता. पण कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे काँग्रेसने शेवटच्या क्षणाला फातोर्डा विधानसभेत उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे विजय सरदेसाई नाराज झाले आणि सत्ता स्थापनेच्यावेळी त्यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. 
 
आणखी वाचा 
 
फातोर्डामध्ये सरदेसाई निवडून आले. काँग्रेस उमदेवार जो डीसिल्व्हा यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. 40 सदस्यांच्या गोवा विधानसभेत काँग्रेसचे सर्वाधिक 17 आणि भाजपाचे 13 आमदार निवडून आले आहेत. काँग्रेसपेक्षा आमदारांची संख्या कमी असूनही भाजपाने छोटया पक्ष आणि अपक्षांना  सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.