शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

काँग्रेस चार तर भाजपाचे तीन नगराध्यक्ष

By admin | Updated: July 23, 2014 00:50 IST

जिल्ह्यातील चिखलदरा वगळता दहापैकी नऊ नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी मंगळवार दि. २२ जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. दोन ठिकाणी नगराध्यक्ष निवडणुकीवर स्थगानादेश

अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडणूक : राकाँ एक, जनसंग्राम दोन, प्रहार एक तर अपक्षांचा दोन पालिकांवर झेंडाअमरावती/वर्धा : जिल्ह्यातील चिखलदरा वगळता दहापैकी नऊ नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी मंगळवार दि. २२ जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. दोन ठिकाणी नगराध्यक्ष निवडणुकीवर स्थगानादेश असून चार नगराध्यक्षांची यापूर्वीच अविरोध निवड झाली आहे. उर्वरित तीन म्हणजे अंजनगाव सुर्जी, चांदूररेल्वे व शेंदुरजनाघाट पालिकेत आज नगराध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. तर वर्धा जिल्ह्यात सहा पालिकांच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेसचा प्रत्येकी दोन पालिकांवर झेंडा फडकला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका पालिकेवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीला जबर हादरा देत हिंगणघाट पालिकेवर अपक्षांनी बाजी मारली.नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपाध्यक्षांमध्ये चांदूर रेल्वे-अंजली अग्रवाल(काँग्रेस),उपाध्यक्ष श्रुतिका आठवले (राष्ट्रवादी), शेंदुरजनाघाट-सरिता खेरडे (विदर्भ जनसंग्राम), उपाध्यक्ष देवानंद झोगेकर (काँग्रेस), अंजनगाव सुर्जी-हनिफाबी मो. शरीफ (काँग्रेस), उपाध्यक्ष देविदास नेमाडे (काँग्रेस), चांदूरबाजार-शुुभांगी देसमुख (प्रहार), उपाध्यक्ष मुजफ्फर हुसैन (प्रहार), वरूड - रवींद्र थोरात (विदर्भ जनसंग्राम), उपाध्यक्ष लिलाधर बेलसरे (शिवसेना), अचलपूर-रंगलाल नंदवंशी (अपक्ष,) उपाध्यक्ष मो. गनी शेख रूस्तम (अपक्ष), धामणगाव रेल्वे - अर्चना राऊत (भाजप), उपाध्यक्ष हेमकरण कांकरिया (भाजप)यांचा समावेश आहे. दर्यापूर पालिकेच्या उपाध्यक्षपदी शहादत खाँ पठाण (काँग्रेस) व मोर्शी पालिकेच्या उपाध्यक्षपदी महादेव वाघमारे (विदर्भ जनसंग्राम) यांची निवड करण्यात आली.चिखलदरा येथील नगराध्यक्ष-उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपायला अवधी असल्याने याठिकाणी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला नाही. दर्यापूर व मोर्शी येथे नगराध्यक्ष निवडीवर न्यायालयाचा स्थगनादेश असल्याने याठिकाणी केवळ उपाध्यक्षांचीच निवड करण्यात आली. चांदूरबाजार, वरूड, अचलपूर व धामणगाव येथे यापूर्वीच नगराध्यक्षांची अविरोध निवड झाली आहे. वर्धा जिल्ह्यात देवळीत खासदार रामदास तडस यांच्या अर्धांगिनी भाजपाच्या शोभा तडस व उपाध्यक्षपदी विजय गोमासे यांची अविरोध निवड झाली. वर्धा पालिकेत आधीच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा आणि अपक्षांची सत्ता होती. यंदा नगराध्यक्षपद राकाँच्या वाट्याला आले. यात राकाँच्या त्रिवेणी कुत्तरमारे यांनी ३९ पैकी २० मते घेत काँग्रेसच्या वर्षा खैरकार यांचा पराभव केला. काँग्रेसच्या १३ पैकी नऊ सदस्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने खैरकार यांना केवळ चार मतेच मिळाली. बहिष्कारात काँग्रेसच्या उमेदवार योगिता बागडे यांचाही समावेश होता. त्यांना शून्य मते मिळाली, तर अपक्ष सदस्य इकबाल शेख यांना निवडणुकीवर बंदी घालण्यात आली होती. उपाध्यक्षपदासाठी भाजपाचे कमल कुलधरीया, काँग्रेसचे शरद आडे आणि बसपाच्या शेख शबनम निवडणूक रिंगणात होते. कुलधरिया यांनी २१ मते घेऊन विजय संपादन केला. हिंगणघाट पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसला जबर हादरा देत अपक्षांनी बाजी मारली. अपक्ष उमेदवार पंढरीनाथ कापसे यांनी ३३ पैकी १८ मते घेत राकाँचे उमेदवार अ‍ॅड. सुधीर कोठारी यांचा पराभव केला. अ‍ॅड. कोठारी यांना केवळ १४ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांनी अ‍ॅड. कोठारी यांना राकाँला घरचा अहेर देत अपक्षांशी हातमिळवणी केली. उपाध्यक्षपदही अपक्षांनीच बळकावले. अपक्ष उमेदवार निलेश ठोंबरे यांनी १८ मते घेत काँग्रेसचे बलराज अवचट यांचा पराभव केला. अवचट यांना १४ मते मिळाली.आर्वीत भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेल्या सरळ लढतीत भाजपाच्या मयुरेश पुरोहित यांनी २३ पैकी १४ मते घेत काँग्रेसच्या वनमाला निखाडे यांचा पराभव केला. निखाडे यांना केवळ नऊ मते मिळाली. उपाध्यक्षपदी भाजपाचे अशोक जिरापुरे निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या प्रेमराज पालिवाल यांचा पराभव केला. जिरापुरे यांना १४ तर पालिवाल यांना नऊ मते मिळाली.पुलगावात काँग्रेसने निर्विवाद यश संपादन केले. काँग्रेसचे मनीष साहू यांनी १९ पैकी १४ मते घेत भाजपाच्या रंजना कडू यांचा पराभव केला. कडू यांना केवळ पाच मते मिळाली. उपाध्यक्षपदीही कॉग्रेसच्या कांचन कोटांगळे यांची वर्णी लागली. त्यांनी भाजपाच्या सोनाली गोदणे यांचा पराभव केला. कोटांगळे १४ तर गोदणे यांना पाच मते मिळाली.सिंदी (रेल्वे) पालिकेवर काँग्रेसने अपक्षाच्या मदतीने सत्ता हस्तगत केली. काँग्रेसच्या सुनीता कलोडे यांनी ९ मते घेत भाजप व राकाँ युतीच्या जिजा तळवेकर यांचा पराभव केला. तळवेकर यांना सात मतेच मिळाली. भाजपाचे एक सदस्य तटस्थ होते, तर उपाध्यक्षपदी अपक्ष उमेदवार अशोक कलोडे हे अविरोध निवडून आले. (प्रतिनिधी)