शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने ७२ वेळा संविधान तोडले- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 23:23 IST

काँग्रेस समाजात गैरसमज पसरवून भोळ्या आणि गरीब जनतेला भीती दाखवून मतांचे राजकारण केले.

भंडारा : ६० वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसनेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान ७२ वेळा तोडले. भाजपाने कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, तरीही काँग्रेस समाजात गैरसमज पसरवून भोळ्या आणि गरीब जनतेला भीती दाखवून मतांचे राजकारण केले, असा आरोप केंद्रीय महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केला.भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ भंडारा येथे आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.डॉ.विकास महात्मे, माजी खा.शिशुपाल पटले, उमेदवार हेमंत पटले, आ. रामचंद्र अवसरे, आ.विकास कुंभारे, आ.मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी, नागपूरचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार, विकास तोतडे, नगराध्यक्ष सुनील मेंढे, डॉ.प्रकाश मालगावे, रोशनी पटेल, अविनाश ठाकरे, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे उपस्थित होते.रामभाऊ अस्वले, लक्ष्मणराव मानकर, श्यामरावबापू कापगते, बापूसाहेब लाखनीकर या कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भाजपचा विचार समाजात पोहोचवल्याचे सांगून ना.गडकरी म्हणाले, त्यावेळी मानसन्मान मिळत नव्हता, प्रतिष्ठा नव्हती तरीही या कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम केले. अशा असंख्य कार्यकर्त्यांचा हा पक्ष असून त्यानंतर नवीन लोकांना पक्षाशी जोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना सामावून घेतले. अशावेळी नाना पटोले आमच्याकडे आले. प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करण्यासाठी मला लोकसभेची उमेदवारी द्या, अशी मागणी केली. आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना उमेदवारी दिली. प्रचंड मतांनी ते निवडूनही आले होते. परंतु आता मात्र प्रफुल्ल पटेल यांचा झेंडा घेऊन ते मते मागत आहेत. राजकारण हे विचारासाठी असते. विचारात मतभेद समजू शकतात पण मनभेद नको. ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि कार्यकर्तेच आमची ताकद असल्याचेही ना.गडकरी म्हणाले.महाराष्ट्राला मी १ लाख कोटी रूपये दिले. ४४० कोटींचा गोसेखुर्द प्रकल्प १८ हजार कोटींचा कसा झाला हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला विचारा? आमच्याबद्दल खोटा प्रचार, जातीयतेचे विष लोकांच्या मनात कालवून, भीती दाखवून मते मागितली जातात. पण सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय प्रस्थापित केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही, असेही नितीन गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी