शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने नारायण राणेंना बारा वर्ष सडवले, आता भाजपवाले कुजवून कुजवून मारतील - सुभाष देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 18:31 IST

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणा-या नारायण राणेंवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी सडकून टीका केली.

रत्नागिरी - काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणा-या नारायण राणेंवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी सडकून टीका केली. जो पक्ष सत्तेत असेल त्यांच्यासमोर नारायण राणे लोटांगण घालतात. आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान ? असा सवाल त्यांनी राणेंना विचारला.  काँग्रेसने नारायण राणेंना बारा वर्ष सडवले, आता भाजपवाले कुजवून कुजवून मारतील अशी आगपाखड देसाई यांनी केली. 

दरम्यान नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होणार आहे. नारायण राणेंनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. नारायण राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. रायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केल्यापासून त्यांचा पक्ष एनडीएमध्ये दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. 

राणेंनी आपला पक्ष एनडीएमध्ये सहभागी होत असल्याची घोषणा केली. त्यावेळी आमदार नितेश राणेंसह अनेक आमदार आपल्या पक्षात येतील, असा दावा केला. मात्र मंत्रिपदाबाबत विचारले असता, आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच ग्रामपंचायत निवडणुकींत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे 29 सरपंच बिनविरोध निवडून आल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.

नीतेश राणेंसह अन्य आमदारही सामिल होतीलआपण एनडीएला पाठिंबा दिला असून आता आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि भाजप पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील. असे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच स्वाभिमान पक्षात आमदार नीतेश राणेंसह राज्यातील अनेक आमदार सामिल होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

स्वाभिमानचे २९ सरपंच बिनविरोधआपण स्थापन केलेल्या नव्या स्वाभिमान पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ सरपंच बिनविरोध निवडून आल्याचे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या कोणत्याही पक्षाचा अजून एकही सरपंच निवडून आलेला नसताना केवळ स्वाभिमान पक्षाचे २९ सरपंच निवडून आल्यामुळे आपली विजयी पताका रोवण्यात आली आहे. आगामी काळात स्वाभिमान पक्ष असेच उज्वल यश संपादन करेल.राणे यांनी काँग्रेसमध्ये असतानाच समर्थ विकास पॅनेलचे स्थापना केली आहे. या पॅनेलच्या माध्यमातून राणे समर्थक सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जात आहेत. गुरूवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. या दिवसापर्यंत सिंधुदुर्गात निवडणुका होत असलेल्या ३२५ ग्रामपंचायतींपैकी २९ ठिकाणचे सरपंच हे समर्थ विकास पॅनेलकडून बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे राणेंच्या स्वाभिमान पक्षाला सिंधुदुर्गातून यश मिळण्यास सुरूवात झाली आहे. असे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे