शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत भारतीय सैनिकांचे अभिनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:34 IST

एकमताने ठराव मंजूर; देशावर वाईट नजर टाकणाऱ्यांना चोख उत्तर द्या

मुंबई : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी पहाटे पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंगळवारी एकमताने मंजूर करण्यात आला.दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी हवाई दलावर अभिनंदनाचा वर्षाव केला. आम्हाला तुमच्या कामगिरीचा अभिमान आहे. भारतावर वाईट नजर टाकणाऱ्यांना अशाच पद्धतीने चोख उत्तर दिले पाहिजे, अशा शब्दांत सत्ताधारी व विरोधकांनी भूमिका मांडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत भारतीय सैन्य आणि हवाई दलाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यास दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी जोरदार पाठिंबा दिला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले ही अभिमानाची बाब आहे. भारत कमजोर देश नाही. जगातील मजबूत सैन्य आणि इतर देशांपैकी भारत एक देश असल्याचे सैन्याने सिद्ध केले आहे. भारतीय म्हणून ही सर्वांसाठी गौरवाची बाब असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, नसीम खान आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.आमची छाती ५६ इंचांची झालीएरवी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारी शिवसेनाही कौतुकात मागे नव्हती. शिवसेनेचे सुभाष साबणे म्हणाले की, जवान आमचा आत्मा असून आज आमची छाती ५६ इंचांची झाली. तर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी देशातील जवानांना सॅल्युट करताना पाकिस्तानवालो होश मे आओ, नाहीतर जगाच्या नकाशावरून गायब व्हाल, असा संताप व्यक्त केला. शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनीही भारतीय सैनिकांचे अभिनंदन केले.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक