शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

काँग्रेससोबत आघाडी हवी पण सन्मानजनक - सुनील तटकरे

By admin | Updated: January 24, 2017 16:46 IST

केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाचा कारभार हा आराजकतेकडे जाणारा आहे, या पक्षाच्या जातीयवादी विचारधारे विरोधात

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 24 - केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाचा कारभार हा आराजकतेकडे जाणारा आहे, या पक्षाच्या जातीयवादी विचारधारे विरोधात धर्मनिरपेक्ष विचारांनी एकत्र आले पहिजे; ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे त्यामुळे आगामी महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणूकांमध्ये काँग्रेस सोबत आघाडी करण्यास आम्ही तयार आहोत. याचा अर्थ काँग्रेस व समविचारी पक्षांनी राष्ट्रवादी कमकुवत आहे असा काढू नये, आम्हाला आघाडी हवीच आहे पण सन्माजनक अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मांडली.  अकोला येथील खुले नाट्यगृहामध्ये माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळया निमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर  आमदार प्रकाश गजभिये, राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते वसंतराव धोत्रे, माजी आमदार तुकाराम बिरकड, राष्ट्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, अकोला महानगर अध्यक्ष अजय तापडीया, वाशीम जिल्हा राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, विदर्भ संघटक रामेश्वर पवळ, संतोष कोरपे आदी उपस्थित होते. तटकरे म्हणाले की, भाजपा-सेनेच्या सत्तेने सामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. अच्छे दिन, बॅक खात्यामध्ये १५ लाख असे स्वप्न सर्वसामान्य जनतेला दाखविले, हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकत नाही हे याच पक्षाचे ज्येष्ठ मंत्री आता खुले आम सांगत आहे. तर दूसरीकडे शेतकरी उध्वस्त करण्याचे धोरण या सरकारचे आहे. काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा करणारे आता मुसलमान मुक्त भारत अशी वल्गना करून लागले आहेत. यावरून त्यांच्यामधील जातीयवादी विचार स्पष्टपणे समोर येतो.  हा देश लोकशाही विचारांचा देश असल्याने अशा धर्मांध शक्तींना जागा दाखविण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षाची मोट बांधणे आवश्यक आहे त्यामुळेच आघाडीसाठी आम्ही सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगीतले. माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी शिवसेना सोडण्यामागील कारणे विषद करतांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. उद्धवांच्या आजूबाजुला हुजºयांची फौज आहे, त्यांना शेतीमधील काही कळत नाही; शेतकरी हिताचा एखादा प्रस्ताव त्यांच्याकडे घेऊन गेलो तर ते आपला पक्ष व्यापाºयांच्या भरवशावर चालतो अशी भूमिका मांडतात या शब्दात गावंडे यांनी आरोप केले. यावेळी जिल्हाध्यक्ष देशमुख यांचीही भाषण झाले. महानगर अध्यक्ष तापडीया  यांनी प्रस्तावना केली. या मेळाव्याला जिल्हाभरातून मोठी उपस्थिती होती. गावंडे यांच्या अनेक समर्थकांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश घेतला.