शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 05:55 IST

अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया मदत केंद्राने केली असता मोबाइलवर ओटीपी येत नसल्याच्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात सुमारे ११ लाख विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली असून त्यात मुंबई विभागातील २ लाख ६५ हजार ९०० अर्जदारांचा समावेश आहे. दरम्यान्या प्रक्रियेत सोमवारी दुपारपर्यंत ९२ तक्रारींची नोंद झाली असून, त्यातील ८५ टक्के तक्रारींचे निराकरण झाले आहे. उर्वरित १५ टक्के तक्रारींमध्ये ओटीपी न मिळणे, रिपीटर विद्यार्थ्यांना फ्रेशर आणि फ्रेशर विद्यार्थ्यांना रिपीटर म्हणून नोंद करणे, नाव व शैक्षणिक वर्ष वेगळे, मात्र सीट नंबर एकच असणे, आदी तक्रारींचा समावेश आहे.

तक्रारी लक्षात घेऊन या प्रवेश प्रक्रियेला ५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाचे संचालक श्रीराम पानझडे यांनी जाहीर केला. प्रवेश प्रक्रियेमध्ये कांदिवलीची मेघना पांचाळ या फ्रेशर विद्यार्थिनीची रिपीटर म्हणून नोंद झाली. अशा विद्यार्थ्यांचा अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया मदत केंद्राने केली असता त्यांना मोबाइलवर ओटीपी येत नसल्याच्या तक्रारीही झाल्या आहेत.

विभागवार नोंदणी

  • पुणे १,८७,९२५
  • मुंबई २,६५,९००
  • कोल्हापूर १,०७,०१२
  • छ. संभाजी नगर १,००,०४०
  • नाशिक १,१२,१०८
  • नागपूर ९५,२१०
  • लातूर ५८,५८६
  • इतर ६१,७१२

तक्रार निवारणाचे प्रयत्न

दोन विद्यार्थ्यांचे एकच सीट क्रमांक, पण वर्ष वेगळे असले तरी नोंदणीमध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे पालक वृषाली झगडे यांनी 'लोकमत'ला सांगितले. याबाबत मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील मदत केंद्राकडून तक्रार सोडविण्याचा प्रयत्न होतो आहे.

माझा मुलगा पार्थ हा फ्रेशर आहे. पण मागच्या वर्षीचा एक रिपीटर विद्यार्थी आणि माझ्‌या मुलाचा सीट नंबर एकच आहे, परंतु वर्ष वेगळे आहे. माझ्या मुलाने नोंदणी केलेली नसतानाही त्याला नोंदणी झाल्याचे पोर्टलवर सांगितले जाते. या अडचणी तातडीने सोडवायला हव्यात.-भावना कुलकर्णी, पालक

माझे दहावीचे ४६९ गुण अधिक इंटरमीडिएट परीक्षेचे ३ गुण गुणपत्रिकेच्या हार्ड कॉपीमध्ये नमूद आहेत. परंतु, ते ऑनलाइन डिजिटल प्रणालीत दिसत नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडचण निर्माण झाली आहे. ही सॉफ्टवेअर प्रणाली लवकर दुरुस्त व्हायला हवी.-मोहम्मद फहिम युसुफ, विद्यार्थी

टॅग्स :collegeमहाविद्यालयAdmissionप्रवेश प्रक्रिया