शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोणारच्या पाणथळ स्थळाचा दर्जावर संभ्रम

By admin | Updated: January 28, 2015 23:28 IST

रामसर साईटच्या संकेतस्थळावर लोणारचा उल्लेखच नाही.

मयुर गोलेच्छा/लोणार (बुलडाणा):जून २0१४ मध्ये लोणार येथील खार्‍या पाण्याच्या सरोवरास आंतरराष्ट्रीय पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते; मात्र हा दर्जा देणार्‍या रामसर साईटच्या अधिकृत संकेत स्थळावर पाणथळ क्षेत्र असलेल्या देशातील स्थळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यामध्ये लोणारच्या खार्‍या पाण्याच्या वैशिष्टपूर्ण सरोवराचे नावच नसल्याने लोणार सरोवराला आंतरराष्ट्रीय पाणथळ क्षेत्राचा दर्जाच मिळाला नसल्याचे स्पष्ट होत आहे.जलीय परिसंस्था व जमिनीवरील परिसंस्था (भूपरिसंस्था) या दोन्हीचेही गुणधर्म असलेल्या स्थळास रामसर साईटच्यावतीने जागतिक पाणथळ स्थळाचा दर्जा बहाल करण्यात येतो. जून २0१४ मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडलेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत राज्यातील जायकवाडी, नांदुर मधमेश्‍वर आणि लोणार सरोवरास आंतरराष्ट्रीय पाणथळ क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले होते. या बैठकीस राज्याचे तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम, वन विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव प्रविण परदेशीसह विविध अधिकारीही उपस्थित होते. लोणार सरोवर हे राज्यातील पहिलेच आंतरराष्ट्रीय पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित झाल्याने पर्यटनवाढीस चालना मिळणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावेळी सांगितले होते. प्रत्यक्षात लोणार सरोवर विकासाच्या बाबतीत प्रशासनाकडून केवळ बडेजावपणा मिरविण्यात येत असून, खरी परिस्थिती काय ती कळायला मार्ग नाही. वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या लोणार सरोवराने जागतिक पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र शासनस्तरावर हा मुद्दा गांभीर्याने घेण्यात आला नाही. आतापर्यंत देशातील २६ स्थळांना पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील एकाही पाणथळ स्थळाचा समावेश नसल्याचे रामसर साईटने प्रसिद्ध केलेल्या यादीवरुन स्पष्ट होत आहे.याप्रकरणी लोणार येथील सरोवर तज्ज्ञ प्रा.सुधाकर बुगदाणे यांनी रामसर साईटच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये लोणारचा समावेशच नसल्याने शासनाचा खोटारडेपणा उघडकीस आल्याचे सांगुन प्रत्यक्षात याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला होता किंवा नाही, याची चौकशी राज्य सरकारने करण्याचे अवाहन करण्याची मागणी केली आहे.