शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

आरटीईच्या तिसऱ्या फेरीबाबत पालकांत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 06:40 IST

दोन फेºया पूर्ण; अद्याप राज्यातील ४९ हजारांहून अधिक जागा रिक्त

मुंबई : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षणांतर्गत होणाºया प्रवेश प्रक्रियेच्या दोन फेºया पूर्ण झाल्या आहेत. तरीही राज्यातील तब्बल १ लाख १६ हजार ८०८ जागांपैकी फक्त ६७ हजार जागांवरच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने तब्बल ४९ हजार ७५४ जागा रिक्त आहेत. आता आरटीईची तिसरी फेरी होणार की नाही, याबाबत पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

वारंवार येणाºया तांत्रिक अडचणींमुळे आरटीई प्रवेशाला विलंब होत असून त्यामुळेच पालकांनी या प्रवेशांकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे. आरटीई प्रवेशाची पहिली सोडत ८ एप्रिलला काढण्यात आली. या सोडतीत राज्यातून ६७ हजार ७०६ तर मुंबईतून ३ हजार ५३२ निवड झाली. विद्यार्थ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे वारंवार मुदतवाढ देऊनही केवळ ४६ हजार ८४२ विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले तर मुंबईतून फक्त २ हजार २५९ बालकांनी प्रवेश घेतला आहे. त्यानंतर दुसरी सोडत तब्बल अडीच महिन्यांनंतर म्हणजे १५ जूनला काढण्यात आली. मात्र तोपर्यंत शाळा सुरू झाल्याने अनेक पालकांनी जिथे प्रवेश मिळेल त्या शाळेत पाल्यांना प्रवेश घेतले. त्यामुळे दुसºया सोडतीलाही पालकांचा अल्प प्रतिसाद मिळाला.

दुसºया सोडतीत राज्यातून फक्त २० हजार २१२ विद्यार्थ्यांनी तर मुंबईतून ८८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे राज्यभरातून दुसºया सोडतीनंतर फक्त ६७ हजार ५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. आरटीई प्रवेशांतर्गत समाजातील वंचित व दुर्बल घटकांना प्रवेश देण्याचा उद्देश असला तरी या प्रक्रियेमध्ये वारंवार येणाºया तांत्रिक अडचणी व सरकारी अनास्थेमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत आहेत. यंदाही सरकारच्या अनागोंदी कारभाराचा फटका आरटीई प्रवेश प्रक्रियेला बसला असून, दोन फेºया पूर्ण झाल्यांनतरही तब्बल ४९ हजार ७५४ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळेच आता तिसºया फेरीबाबत पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे....म्हणूनच अनेक विद्यार्थी ठरले अपात्रआरटीईच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना प्रवेशासंबंधी वारंवार मोबाइलवर माहिती देण्यात येते. मात्र, काही पालकांनी शाळा व शिक्षण विभागाशी संपर्क न साधल्यामुळे अनेक विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. तसेच दोन फेºयांमध्ये प्रवेशासाठी लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांपैकी तेरा विद्यार्थी कागदपत्रांमधील त्रुटीमुळे अपात्र ठरत असल्याचेही समोर आल्याचे काही अधिकाºयांनी सांगितले आहे.