शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फरार शिक्षकाच्या सुटी अर्जावरून दोघांचा पळशी येथील शाळेत गोंधळ! मुख्याध्यापकाला धमकी: महिलेसह दोघांविरोधात गुन्हा

By अनिल गवई | Updated: September 3, 2022 15:48 IST

प्रेमकविता लिहून शिक्षिकेच्या नावाने व्हायरल प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकांच्या पत्नी आणि भावाने शुक्रवारी दुपारी पळशी बु. येथील जिल्हा परिषद शाळेत एकच गोंधळ घातला.

खामगाव:

प्रेमकविता लिहून शिक्षिकेच्या नावाने व्हायरल प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकांच्या पत्नी आणि भावाने शुक्रवारी दुपारी पळशी बु. येथील जिल्हा परिषद शाळेत एकच गोंधळ घातला. फरार शिक्षकाची सुटी तात्काळ मंजूर करण्यासाठी दबाव आणत सुटी अर्जाच्या सत्यप्रतीवर स्वाक्षरी आणि शिक्का देण्यासाठी धमकी दिली. याप्रकरणी मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकाच्या पत्नीसह भावाविरोधात ग्रामीण पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

शाळेतील सहकारी शिक्षिकेच्या नावे प्रेमकविता लिहून शैक्षणिक ग्रुपवर व्हायरल केली. तसेच शिक्षिकेशी जवळीत साधण्याच्या उद्देशाने तिच्याकडे टकटक पाहत शिक्षिकेचा विनयभंग केला. याप्रकरणी संबंधित शिक्षिकेच्या तक्रारीवरून रोहिदास रामदास राठोड (५२) या शिक्षकाविरोधात ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, या शिक्षकाची सुटी तात्काळ मंजूर करा तसेच सुटी अर्जाच्या सत्यप्रतीवर स्वाक्षरी आणि शिक्यासाठी दबाव आणला. तसेच मुख्याध्यापकाच्या टेबलावरील शिक्का घेऊन स्वत:च्या हाताने सत्यप्रतीवर मारला. त्यानंतर शिक्का फेकून देत मुख्याध्यापकांना धमकी दिली. अशी तक्रार पळशी बु. येथील मुख्याध्यापक कैलास प्रभु राठोड (५४ रा. पळशी बु.) यांच्या तक्रारीवरून दिपाली रोहिदास राठोड रा. खामगाव, शिवदास रामदास राठोड रा. बुलढाणा यांच्या विरोधात खामगाव ग्रामीण पोलिसांनी  भादंवि कलम १८६, १८९ तसेच क्रिमीनल लॉ अमेंटमेंट अ‍ॅक्ट १९३२ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला.