शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळातच वाया जात आहे विधिमंडळाचा वेळ : राजेंद्र दर्डा

By admin | Updated: December 20, 2015 02:10 IST

सध्या संसद व विधिमंडळात अभ्यासपूर्ण भाषणांची उणीव जाणवते आहे. विकासावर चर्चा होण्याऐवजी गोंधळातच वेळ वाया जात आहे. जनहिताच्या विधेयकांना चर्चेशिवाय मंजुरी देण्यात येत आहे.

नागपूर : सध्या संसद व विधिमंडळात अभ्यासपूर्ण भाषणांची उणीव जाणवते आहे. विकासावर चर्चा होण्याऐवजी गोंधळातच वेळ वाया जात आहे. जनहिताच्या विधेयकांना चर्चेशिवाय मंजुरी देण्यात येत आहे. योजनांच्या अंमलबजावणीबाबत आग्रही भूमिका घेतली जात नाही. सरकार व विरोधी पक्ष ही लोकशाहीची दोन चाकं आहेत. त्यामुळे सरकारने विरोधकांना विश्वासात घेतलेच पाहिजे आणि विरोधी पक्षांनीही जनहिताच्या विधेयकांसाठी सहकार्य करायला हवे, असे मत लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केले.पां.वा. गाडगीळ, बाबा दळवी स्मृती पत्रकारिता प्रदान समारंभातील अध्यक्षीय भाषणात राजेंद्र दर्डा यांनी लोकशाही समृद्ध करण्यावर भर दिला. ते म्हणाले, संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा यांची लोकमत दैनिक सुरू करण्यामागची भावना शोषित वंचितांना न्याय देण्याची आणि लोकशाहीला अधिक मजबूत करण्याची होती. लोकमतचे पहिले संपादक पत्रपंडित पद्मश्री पां.वा. गाडगीळ यांनी आर्थिक आणि सामाजिक विषयावर विपुल लेखन केले. साम्यवाद आणि समाजवादाचे मध्यसूत्र सर्वसामान्य माणसाला सोप्या भाषेत त्यांनी समजावून सांगितले. त्यामुळे लोकमतने गाडगीळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ १९८८ मध्ये सामाजिक-आर्थिक विकास लेखन पुरस्कार सुरू केला. त्यांच्यानंतर लोकमतची धुरा सांभाळलेले म.य. उपाख्य बाबा दळवी यांच्या लेखनीला सामाजिक भान होते. त्यांना परिवर्तनाचा ध्यास होता. त्यांनी महाराष्ट्रातील वृत्तपत्र सृष्टीला समतेचा डोळा दिला. त्यांनी शोषितांना लढण्याचे बळ आणि मुक्यांना शब्द दिले. त्यामुळे १९९६ साली बाबांच्या नावाने लोकमतने राज्यस्तरीय शोधपत्रकारिता पुरस्कार सुरु केला. वाचक हाच केंद्रबिंदू मानून एक परिपूर्ण वृत्तपत्र म्हणून लोकमतची वाटचाल यापुढेही सुरू राहील, असे राजेंद्र दर्डा यांनी शेवटी सांगितले.