औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पँथर रिपब्लिकन पार्टीचे नेते गंगाधर गाडे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे रिपाइं आठवले गट आणि पँथरमधील संघर्ष पेटला आहे. टीकेमुळे संतापलेल्या पँथर रिपब्लिकनच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी रिपाइं (ए) चे कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांच्या संगीता कॉलनीतील निवासस्थानावर दगडफेक केली. बाबूराव कदम यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी पँथर रिपब्लिकन पार्टीचे नेते गंगाधर गाडे यांच्यावर टीका केली. तेव्हापासून या दोन्ही गटांमध्ये धुसफूस सुरू झाली होती. (प्रतिनिधी)
रिपाइं-पँथरमध्ये संघर्ष पेटला
By admin | Updated: March 29, 2015 01:10 IST