शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
2
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
4
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
5
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
6
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
7
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
8
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
9
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
10
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
11
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
12
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
13
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
14
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
15
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
16
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
17
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
18
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
19
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?

कोपर्डीतील क्रूरतेचे विधिमंडळात पडसाद

By admin | Updated: July 19, 2016 05:29 IST

कोपर्डी (ता.कर्जत ) येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येचे राज्यात विविध ठिकाणी व विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात तीव्र पडसाद उमटले.

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी (ता.कर्जत ) येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येचे राज्यात विविध ठिकाणी व विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी अत्यंत आक्रमक होत या घटनेप्रकरणी स्थगन प्रस्ताव स्वीकारून तातडीने चर्चा करावी, अशी मागणी केली. मात्र, ती फेटाळण्यात आली. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जाईल. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम मांडतील, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी चर्चेची मागणी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनीही इतर सगळे कामकाज बाजूला सारून महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणाऱ्या या घटनेवर चर्चेची मागणी लावून धरली. अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी स्थगन प्रस्ताव अमान्य केला. मात्र, या घटनेवर सभागृहात अन्य आयुधाद्वारे चर्चा केली जाईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांना निवेदन करण्यास अनुमती दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, १३ जुलैला ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी गुन्हे दाखल केले. आतापर्यंत तीन आरोपींना अटक झाली आहे. त्यांना कठोर शिक्षा व्हावी ही सरकारची भूमिका असेल. मात्र केवळ निवेदन नको, असे म्हणत विरोधक आक्रमक झाले. (विशेष प्रतिनिधी)>राज्यभर निषेध .... कोपर्डी प्रकरणाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, बुलडाणा आदी जिल्ह्यात निषेध मोर्चे काढण्यात आले, तर काही ठिकाणी बंद पाळण्यात आला. संभाजी ब्रिगेड, छावा, मराठा महासंघ, जिजाऊ ब्रिगेडसह विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली. >आठ लाखांची मदतमुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पीडित मुलीच्या कुटुंबास ५ लाख रुपये तर मनोधैर्य योजनेतून तीन लाख रुपयांची मदत तातडीने दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्या कुटुंबास आणि साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. कठोर कायदा करा : अजित पवारमुख्यमंत्र्यांनी केवळ निवेदन देऊन संपविण्यासारखा कोपर्डीचा विषय नाही. आज लोकप्रतिनिधी म्हणवून घ्यायला लाज वाटते. तुमच्या आमच्या घरातील मुलगी समजा आणि तातडीने कारवाई करा, बलात्कार करण्याची कोण्या पुरुषाची हिंमत होता कामा नये असा कठोर कायदा करा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.आणखी एका आरोपीचा शोध सुरू : या प्रकरणातील जितेंद्र शिंदे उर्फ पप्पू (२५), संतोष भवाळ (३६) आणि नितीन भैलुमे (२६) संशयितांना अटक केली असून सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.