शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

अविश्वासाच्या वातावरणात ‘विश्वास’ मंजूर, विरोधक पक्षांची राज्यपालांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 05:22 IST

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधी पक्षांनी दिलेल्या अविश्वास ठरावावर निर्णय होण्याआधीच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीे अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मांडून शिवसेनेच्या साहाय्याने आवाजी मतदानाने मंजूरही करवून घेतला. सत्तापक्षाच्या या कृतीने लोकशाहीचा खून झाला असून, आम्ही यापूर्वी दाखल केलेला अविश्वास ठराव डावलण्यात आल्याची तक्रार विरोधकांनी राज्यपालांकडे केली आहे.

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधी पक्षांनी दिलेल्या अविश्वास ठरावावर निर्णय होण्याआधीच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीे अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मांडून शिवसेनेच्या साहाय्याने आवाजी मतदानाने मंजूरही करवून घेतला. सत्तापक्षाच्या या कृतीने लोकशाहीचा खून झाला असून, आम्ही यापूर्वी दाखल केलेला अविश्वास ठराव डावलण्यात आल्याची तक्रार विरोधकांनी राज्यपालांकडे केली आहे.मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना गाफील ठेवून, अचानक अध्यक्षांवर चार ओळींचा विश्वासदर्शक ठराव आणला. शिवसेनेचे सभागृह नेते एकनाथ शिंदे यांनी त्यास अनुमोदन दिले. तालिका अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी चर्चेविना तो मतदानास टाकला आणि विरोधकांच्या गोंधळाततो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.त्यानंतर, विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज तहकूब करण्यात आले. पुन्हा कामकाज सुरू होताच, भाजपाच्या सदस्यांनी ‘भारत माता की जय’ अशा जोरदार घोषणा सुरू केल्या. काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य शांत होते. तालिका अध्यक्षांनी कामकाज पुन्हा तहकूब केले. ते पुन्हा सुरू होताच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील बोलायला उभे राहिले व विरोधकांचा अध्यक्षांवरील अविश्वास ठराव वाचू लागताच मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलण्यापासून रोखले.विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे यांनी अध्यक्षांवरील अविश्वासदर्शक ठरावाची कार्यपद्धती वाचून दाखविण्यास सुरुवात केली. त्यावर मंत्री गिरीश बापट यांनी हरकत घेत, तोच विषय पुन्हा मांडता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर, सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी विरोधकांचा धिक्कार करत घोषणाबाजी केली. गदारोळात तालिका अध्यक्ष अशोक साबणे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. त्यानंतर सत्ताधारी बाकावरील सदस्य निघून गेले. मात्र, विरोधी बाकावरील सर्व सदस्य विधानसभेत, तसेच सायंकाळी४ वाजेपर्यंत ठाण मांडून होते.राज्यपालांसमोर मांडली कैफियतविरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने सायंकाळी राजभवनावर जाऊन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. विरोधकांचा हक्क डावलून अचानक विश्वासदर्शक ठराव आणणे ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि तशी कैफियत त्यांनी राज्यपालांसमोर मांडली.सत्ताधाऱ्यांनी गोंधळ करून कामकाज उरकून घेणे ही लोकशाहीला काळिमा फासणारी गोष्ट आहे. सभागृहात मंत्री येत नाहीत, लक्षवेधीची उत्तरे आली नाही, म्हणून कामकाज पुढे ढकलले जाते.- दिलीप वळसे पाटील, माजी अध्यक्ष, विधानसभाआम्ही कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करणार होतो. सरकारच्या कारभाराचे आम्ही धिंडवडे काढले असते, पण ते सरकारला नको होते, म्हणून सरकारने कामकाज गुंडाळले. बहुमत असूनही सरकार मतदानास घाबरले.- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेVidhan Bhavanविधान भवन