शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘संगणकीय नस्ती मागोवा’ प्रणाली

By admin | Updated: June 28, 2016 02:32 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम समितीच्या सभापती चित्रा पाटील यांनी तयार करून अमलात आणली आहे.

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता आणण्याकरिता माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बांधकाम आणि अर्थ विभागांतर्गत ‘संगणकीय नस्ती मागोवा प्रणाली’ (कॉम्प्युटराईज्ड आॅनलाइन पाईल ट्रॅकिंग सिस्टीम) रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम समितीच्या सभापती चित्रा पाटील यांनी तयार करून अमलात आणली आहे. परिणामी आता या विभागातील कार्यपूर्तीमधील विलंब पूर्णपणे कमी होवून कामकाज गतिमान होईल, असा विश्वास अर्थ आणि बांधकाम समितीच्या सभापती चित्रा पाटील यांनी व्यक्त केला आहे.रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत विविध लेखाशीर्षांतर्गत ग्रामीण विभागात कामे मंजूर केली जातात. ही कामे पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय मान्यता, काम वाटप, कार्यारंभ आदेश, पाठपुरावा आणि देयक अदा करणे या प्रक्रिया समाविष्ट आहेत. एका आर्थिक वर्षात जिल्हा परिषद आणि शासकीय निधीमधून विविध लेखाशीर्षांतर्गत जिल्हा परिषदेकडे अंदाजे १५०० कामे मंजूर होतात. चालू आर्थिक वर्षाची मंजूर कामे आणि मागील आर्थिक वर्षातील मंजूर कामे अशा एकूण कामांच्या अंमलबजावणीवर प्रचलित कार्यप्रणालीद्वारे नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे कामे पूर्ण करण्याचे नियोजन करताना समस्या निर्माण होतात. त्यामुळे एखादा कामाच्या नस्तीची सद्यस्थिती (फाईल स्टेटस) काय आहे, हे प्रचलित कार्यपद्धतीनुसार सांगणे कठीण असते. तसेच नस्ती कोणत्या कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याकडे किती दिवस प्रलंबित आहे याचा लवकर बोध होत नाही. एकंदरच सर्व कार्यप्रणालीत पारदर्शकता येण्याच्या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बांधकाम आणि अर्थ विभागांतर्गत संगणकीय नस्ती मागोवा प्रणाली प्रभावी ठरणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे यांच्या हस्ते या आॅनलाइन प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य अ‍ॅड.नीलिमा पाटील, प्रिया पाटील आदी उपस्थित होते.>आॅनलाइन माहिती डॉ. अविनाश गोटे यांनी अर्थ व बांधकाम समिती सभापती चित्रा पाटील यांचे अभिनंदन करुन या कार्यप्रणालीमधील पारदर्शकतेमुळे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर अधिक जबाबदारी आली असल्याचे लक्षात आणून दिले. कंत्राटदारांना त्यांची नस्ती कुठल्या कार्यासनाकडे प्रलंबित आहे याची माहिती आॅनलाइन मिळणार आहे. शासन स्तरावरुन मागविण्यात येणाऱ्या विविध पद्धतीच्या माहितीचे संकलन करणे आता सोयीस्कर होणार आहे.