शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

कोल्हापूरातील ४८ हजार शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2017 01:41 IST

कोल्हापूरातील शेतकऱ्यांना वार्षिक पीक कर्ज मर्यादेइतकीच कर्ज माफी देऊन त्यापेक्षा अधिक कर्जमाफी दिली असल्यास ती वसूल करण्यात यावी, हा नाबार्डने कोल्हापूर

मुंबई : कोल्हापूरातील शेतकऱ्यांना वार्षिक पीक कर्ज मर्यादेइतकीच कर्ज माफी देऊन त्यापेक्षा अधिक कर्जमाफी दिली असल्यास ती वसूल करण्यात यावी, हा नाबार्डने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (केडीसीसी) दिलेला आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोल्हापूरातील ४८ हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पीककर्ज मर्यादा हा कर्ज वसूल करण्यासाठी निकष असू शकत नाही, असे म्हणत न्या. आर. एम. बोर्डे व न्या. अजय गडकरी यांनी कर्ज वसूल करण्याचा नाबार्डचा निर्णय रद्द केला.२००८ मध्ये केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे पीक कर्ज रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरमधील सुमारे ४८ हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या या धोरणाचा लाभ घेतला. पंरतु, २०१२ मध्ये काही लोकांनी नाबर्डकडे या योजनेचा काही शेतकऱ्यांनी गैरफायदा घेतल्याची तक्रार केली. त्यावरून नाबार्डने केडीसीसी बँकेला लेखापरीक्षण करण्याचे आदेश देत ज्यांनी पीककर्ज मर्यादेपेक्षा अधिक कर्ज घेतले आहे, त्या शेतकऱ्यांकडून अधिकची रक्कम वसूल करण्यात यावी, असे फर्मान काढले. नाबार्डच्या या आदेशाला शेतकऱ्यांनी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले. मूळ धोरणात केंद्र सरकारने संपूर्ण कर्जमाफी, असे नमूद केले आहे. मात्र नाबार्डने पीक कर्जाचा निकष लावून ४८ हजार शेतकऱ्यांकडून सुमारे १११ कोटी रुपये वसूल करण्याचा निर्णय घेतला. नाबार्डचा कर्जवसुलीचा निर्णय बेकायदेशीर व मनमानी असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील प्रसाद ढाके-फाळके व धैर्यशाील सुतार यांनी केला. ‘रेकॉर्ड्सची खाडाखोड करून अपात्र शेतकऱ्यांनाही कर्ज माफीसाठी पात्र करण्यात आले. काही बोगस खाती काढण्यात आली. त्यामुळेच नाबार्डने अतिरिक्त कर्ज वसूल करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने तटस्थ राहत भूमिका स्पष्ट केली. संबंधित शेतकऱ्याचे कर्ज १९९७ ते २००७ या दरम्यान पीक कर्जच घेतलेले असावे आणि फेब्रुवारी २००८ पर्यंत त्याने कर्जाची परतफेड केलेली नसावी, अशा अटी केंद्र सरकारने पीक कर्ज माफ करताना घातल्या होत्या,’ सोमवारी निकाल देताना खंडपीठाने हा निकाल शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन देण्यात येत आहे, असे म्हटले.‘बँकेने कर्जवसुलीसाठी पीक कर्ज मर्यादेचा लावलेला निकष गैर असल्याने कर्ज वसुलीसाठी हा निकष लागू शकत नाही,’ असे खंडपीठाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी) अपात्र कर्जमाफीविरोधात कृती समितीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांची व्यथा मांडली, त्याला यश आल्याचा आनंद होत आहे. - अनिल यादव, प्रमुख, अपात्र कर्जमाफी कृती समिती.न्यायालयाने शेतकऱ्यांच्या हिताची बाजू घेत कर्जमाफीचा लाभ मिळवून दिला.- अ‍ॅड. धैर्यशील सुतार, याचिकाकर्त्यांचे वकील.