शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

टँकरला डिझेलच मिळत नसल्याची तक्रार

By admin | Updated: May 19, 2016 01:57 IST

पंचायत समितीच्या सभागृहात या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत संपन्न झाली

सासवड : येणाऱ्या खरीप हंगामासाठी शासनाच्या विविध विभागांनी केलेल्या तयारीचा आढावा आणि टंचाई बैठक सासवड येथे पुरंदर पंचायत समितीच्या सभागृहात या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यामध्ये कृषी विभागातील भ्रष्ट कारभार आणि टंचाई काळात पाणी टँकरला डिझेल न मिळणे यावर प्रामुख्याने चर्चा झाली. कंद यांनी डिझेलची व्यवस्था त्वरित करू असे सांगितले. तर तालुका कृषी विभागाला कडक भाषेत सुचना दिल्या. याचबरोबर दुष्काळाचे संकट आहे त्याला सर्वांनी मिळून तोंड द्यावे असे आवाहन केले. पुरंदर तालुक्याला जिल्हा परिषदेने झुकते माप दिले आहे, टंचाईसाठी एकट्या पुरंदरला सव्वा आठ कोटींचा निधी दिला असून सध्या साडे तीन कोटींची विविध कामे सुरु आहेत अशी माहिती कंद यांनी दिली. याच सभेत बापू भोर यांनी, शासनाने शेतक-यांना संपूर्ण कर्ज माफी करावी, शेती पंपांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे आणि पारगाव - माळशिरस या प्रादेशिक योजनेसाठी जिल्हा परिषदेने दिलेल्या २५ लाखांच्या मदतीबद्दल अभिनंदन करून आणखी १५ लाखांच्या मदतीची मागणी केली. निरा बाजार समितीचे सभापती नंदकुमार जगताप यांनी पूर्वीप्रमाणेच पणन विभागाकडे क्रेट आणि कांदा चाळ योजना देण्याची मागणी केली तसेच खासदार या नात्याने सुप्रिया सुळे यांनी कांदा खरेदी क्षमता वाढवावी अशी मागणी केली.शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे यांनी, जिल्हा परिषदेमार्फत शेतक-यांना मिळणा-या सवलतीत नगरपालिका हद्दीतील शेतक-यांचा समावेश करावा अशी मागणी केली. तर पोपट थेउरकर यांनी, कृषी विभागाने गावनिहाय खत आणि बियाण्यांचे वर्गीकरण करावे असे सांगितले. खरीप हंगामासाठी खत आणि बियाणे पुरेसे उपलब्ध असल्याचे कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी सांगितले. तालुक्यात सध्या ९ शासकीय आणि ७ खासगी टँकरद्वारे दररोज ५० खेपा करून पाणी पुरवठा केला जात असून आणखी १० गावांचे प्रस्ताव आहेत असे कोकरे पाणी पुरवठा अभियंता सांगितले. तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण यांनी भैरावाडी या पुरंदर किल्ल्याच्या परिसरातील गावाला टँकर मिळावा, अपंग संघटनेचे अमोल बनकर यांनी शिवरी प्रादेशिक योजना दुरुस्तीअभावी बंद असल्याने निळूंज गावाला टँकर मिळावा, विद्यार्थी कॉंग्रेसचे संग्राम सस्ते यांनी टँकर मागणीची प्रक्रिया सोपी करावी असे सांगून साकुर्डेच्या थोपटेवाडीला ट्याकर मिळण्याची मागणी केली.पूर्व भागातील शेतकऱ्यांनी पुरंदर उपसातून पाणी मिळण्याची मागणी केली. यावर कंद यांनी सर्व मागण्या मार्गी लावू असे आश्वासन दिले. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी, या सरकारचे शेतीबाबतचे धोरण आणि त्यासाठी दिलेला निधी याबाबत सर्वांना माहित असल्याने त्याबाबत न बोललेलेच बरे असे सांगितले. याबैठकीला सर्व गावांतील ग्रामसेवक उपस्थित असणे गरजेचे असताना ५५ पैकी निम्मेही ग्रामसेवक उपस्थित नसल्याचे आढळले. किती ग्रामसेवक उपस्थित आहेत याचा आढावा घ्यावा अशी मागणी ईश्वर बागमार यांनी केली. अनेक गावांतून ग्रामसेवक वरिष्ठ पातळीवर माहिती देत नसल्याचेही निदर्शनास आले. गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, कृषी विभागाच्या सभापती सारिका इंगळे, पं. स. सभापती अंजना भोर, तहसीलदार संजय पाटील, उपसभापती अनिता कुदळे, जि. प. सदस्य गंगाराम जगदाळे, विराज काकडे, मनीषा काकडे, पं. स. सदस्य दत्ता झुरंगे, माणिक झेंडे, यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)