शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अंनिसची बदनामी करणा-यांचा लागला छडा, सायबर सेलकडे तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 16:02 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दान केलेल्या गणपतीच्या मूर्ती विकल्या असल्याचे खोटे मेसेज व्हॉटस्अप, फेसबुकवरून व्हायरल करण्यात आले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार नोंदविली आहे. त्याचबरोबर या मेसेजचा माग काढत हे खोटे मेसेज पाठविणा-यांचा छडा लावण्यात यश आले आहे. 

पुणे, दि. 12 - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दान केलेल्या गणपतीच्या मूर्ती विकल्या असल्याचे खोटे मेसेज व्हॉटस्अप, फेसबुकवरून व्हायरल करण्यात आले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार नोंदविली आहे. त्याचबरोबर या मेसेजचा माग काढत हे खोटे मेसेज पाठविणा-यांचा छडा लावण्यात यश आले आहे. नाशिकमधील एका संघटनेशी संबंधित असलेल्यांकडून करण्यात आला आहे, लवकरच संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. अंनिसचे राज्याचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, शहर कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.अंनिसच्या वतीने गेल्या 20 वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेशोत्सव हा उपक्रम राबविला जात आहे. कोल्हापुरातून सुरू झालेला हा उपक्रम आज राज्यभर जनचळवळ बनली आहे. पुण्यातील मानाच्या 5 गणेशोत्सव मंडळांनीही गणेश मूर्तींचे नदीत विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचा अभिनव पायंडा पाडला. यापार्श्वभूमीवर अंनिसची बदनामी करणारे मेसेज गणेश विसर्जनानंतर व्हायरल करण्यात आले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरुद्ध सायबर सेलकडे तक्रार दाखल केलीच. त्याचबरोबर स्वत: त्या मेसेजचा माग घेत शोधून काढले आहे.मिलिंद देशमुख यांनी सांगितले, गणेश विसर्जनामध्ये दान केलेल्या मूर्ती विक्री करताना अंनिसच्या कार्यकर्त्यांना पकडण्यात आले. त्यांना नागरिकांनी चोप दिला. तसेच त्यांच्याविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचे खोटे मेसेज व्हॉट्सअॅपवरून व्हायरल करण्यात आले होते. मुंढवा पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारचा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तसेच संबंधित पोलीस अधिका-याचे दिलेले नावही खोटे आहे. नागरिकांनी या खोटया पोस्टवर विश्वास ठेऊ नये, तसेच अफवांना बळी पडू नये. ही फेक न्यूज प्रसारीत करणा-यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.शासनाचे पाऊल योग्यपर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये सहभागी न होण्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महाविद्यालयांना देण्यात आलेले परिपत्रक हे शासनाच्याच धोरणाच्या विरोधात होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित परिपत्रक रदद् केले. तसेच ते काढणा-या अधिका-याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. शासनाकडून उचलण्यात आलेले पाऊल अत्यंत योग्य आहे.