शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

खडसेंविरुद्ध विनयभंगाची तक्रार; जळगाव, मुंबईत फिर्याद : अंजली दमानिया यांच्याबद्दल अपशब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 03:38 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विनयभंगाची तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई/जळगाव : भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विनयभंगाची तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, दमानिया यांचे सर्व आरोप खडसे यांनी फेटाळले असून कोणाबद्दलही अपशब्द वापरले नाहीत, असा खुलासा केला आहे.२ सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर येथे खडसे यांचा वाढदिवस साजरा झाला. या कार्यक्रमात बोलताना खडसे यांनी केलेल्या विधानावर दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. खडसे यांनी आपल्याबद्दल अत्यंत अशोभनीय व असभ्य भाषा वापरली असून त्यांच्याविरुद्ध कलम ३५४ प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.याबाबत दमानिया यांनी मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून जळगावचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे मेलद्वारे तक्रार केली आहे. सोबतच खडसे यांच्या ‘त्या’ भाषणाची क्लीपही पुरावा म्हणून पाठविली आहे.दरम्यान, खडसे यांनी या आरोपांचे खंडण केले आहे. माझे शेतीपासूनचे उत्पन्न वाढले. आंब्याची झाडे, त्यांचा आकार वाढला. तसेच दमानियांच्या शेतातील उत्पन्नही वाढले असेल, असे मी बोललो. यात एक महिला म्हणून त्यांना हिणवण्याचा वा त्यांच्याविषयी अश्लील बोलण्याचा माझा हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिले.