शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन सॉफ्टवेअर चोरल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 06:00 IST

नुकत्याच लोकार्पण करण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) आॅनलाइन सॉफ्टवेअरच्या विरोधात एफडीएच्या आयुक्त पल्लवी दराडे यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.

मुंबई : नुकत्याच लोकार्पण करण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) आॅनलाइन सॉफ्टवेअरच्या विरोधात एफडीएच्या आयुक्त पल्लवी दराडे यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. या आॅनलाइन सॉफ्टवेअरमध्ये वापरण्यात आलेली माहिती आपल्याकडून चोरल्याचा आरोप ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला आवश्यक असलेले आॅनलाइन सॉफ्टवेअर आपणच तयार केल्याचा सूर्यवंशी यांचा दावा आहे.संबंधित सॉफ्टवेअर तयार करून, त्याचे सादरीकरण एफडीएच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुल येथील कार्यालयात करण्यात आले होते. मात्र, या सॉफ्टवेअरची सर्व माहिती संबंधित अधिकाºयांनी एका संस्थेला पुरविली, संस्थेच्या आपल्या सॉफ्टवेअरची गरज नसल्याचे कारण सांगण्यात आले. मात्र, अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी नवे आॅनलाइन सॉफ्टवेअरचे लोकार्पण केले. या सॉफ्टवेअरमधील बहुतेक डाटा हा आपल्याच सादरीकरणातून चोरल्याचा दावा सूर्यवंशी यांनी केला आहे. या सॉफ्टवेअरसाठी झालेल्या लाखो रुपयांच्या व्यवहाराचीही चौकशी करण्याचे आवाहन त्यांनी तक्रारीत केले आहे.