बोईसर : तारापूर एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीला रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्फोट होऊन भीषण आग लागली. स्फोटाचे तीन-चार मोठे आवाज झाल्याने या परिसरात घबराट पसरली. अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी पोचले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.तारापूर एमआयडीसीतील एन झोनमधील न्यूट्राप्लस कंपनीत ही आग लागली. स्फोटाचे आवाज इतके मोठे होते की त्याचा आवाज चार ते पाच किलोमीटरपर्यंत ऐकू आले. जवळच्या कोलवडे गावातील घरांना यामुळे हादरे बसले. त्यामुळे गावात घबराटीचे वातावरण होते. तसेच आजूबाजूच्या कंपन्यांनाही धोका निर्माण झाला आहे.
तारापूरमध्ये कंपनीत भीषण आग, स्फोट
By admin | Updated: August 4, 2014 04:03 IST