शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नियमनमुक्तीचा पेच सोडविण्यासाठी समिती नेमणार

By admin | Updated: July 22, 2016 04:21 IST

भाजीपाला आणि फळे नियमनमुक्तीच्या निर्णयानंतर निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार

मुंबई : भाजीपाला आणि फळे नियमनमुक्तीच्या निर्णयानंतर निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीत सरकार, प्रशासन, शेतकरी, व्यापारी, माथाडी आणि बाजार समित्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल, अशी माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. येत्या ६ आॅगस्टपर्यंत ही समिती राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार असल्याचेही खोत यांनी स्पष्ट केले. नियमनमुक्तीच्या निर्णयामुळे व्यापा-यांनी पुकारलेला बंद आणि माथाडी कामगारांमधील नाराजीबाबत राष्ट्रवादीचे सदस्य नरेंद्र पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. नियमनमुक्तीचा निर्णय घेताना राज्य सरकारने कृषी उत्तन्न बाजार समित्यांमधील व्यापा-यांवर बंधने घातली. मात्र, अन्य व्यापारी उद्योगपतींना सूट मिळाली. राज्यात सुमारे साडेतीनशेहून अधिक कृषी उत्तन्न बाजार समित्या आहेत. या समित्यांमधील व्यापारी कायद्याच्या चौकटीत व्यापार करतात. त्यामुळे सरकारने व्यापा-यांचेही हित सांभाळणे अपेक्षित आहे. नियमनमुक्तीबाबत सरकारने चर्चेद्वारे योग्य धोरण ठरवावे. यासंदर्भात राज्य सरकारने समिती नेमण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही ही समिती नियुक्त झालेली नाही. तसेच व्यापा-यांच्या संपकाळात बंद केलेले चेकनाके पुन्हा सुरु करावेत, अशी मागणी आ. पाटील यांनी यावेळी केली. यावर माथाडी, व्यापारी आदींच्या मागणीनुसार राज्य सरकारने पणनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.