शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल चोरी रोखण्यास समितीचे गठण!

By admin | Updated: June 22, 2017 05:22 IST

पेट्रोल व डिझेल चोरीचे प्रकरण ठाण्यात उघडकीस आल्यानंतर राज्याचे वैध मापन शास्त्र विभाग अधिक सतर्क झाले आहे.

चेतन ननावरे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पेट्रोल व डिझेल चोरीचे प्रकरण ठाण्यात उघडकीस आल्यानंतर राज्याचे वैध मापन शास्त्र विभाग अधिक सतर्क झाले आहे. मापात माप करणाऱ्या पेट्रोलपंपांवरील डिस्पेन्सींग युनिटची पडताळणी व मुद्रांकन करताना युनिटमधून गैरप्रकार करता येऊ नये, म्हणून पडताळणी व मुद्रांकनाची विशिष्ठ कार्यपद्धती निश्चित करून ती सादर करण्यासाठी विभागाने एक समिती गठीत केली आहे. याशिवाय राज्यातील सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना २३ ते २९ जूनदरम्यान डिस्पेन्सरमधील अनुचित प्रकार रोखण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.वैध मापन शास्त्र विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलपंपांवरील चीप आणि रिमोटच्या मदतीने होणाऱ्या चोरीची गंभीर दखल केंद्र शासनाने घेतली. शिवाय, असे अनुचित प्रकार रोखण्यासाठी सर्व राज्यांतील वैध मापन शास्त्र यंत्रणेतील निवडक अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी दिल्लीच्या इंडियन इन्स्टीट्युट आफ पब्लिक अ‍ॅडमिनीस्ट्रेशन याठिकाणी २९ मे रोजी बोलावले होते. यासंदर्भात वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक अमिताभ गुप्ता म्हणाले की, पेट्रोलपंपावरील युनिटमधून गैरप्रकार होऊ नये, या अनुषंगाने पडताळणी व मुद्रांकनाची विशिष्ठ कार्यपद्धती निश्चित करून ती सादर करण्यासाठी नाशिक विभागाचे उप नियंत्रक एस.टी. चालिकवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये मुंबई महानगर विभागाचे उपनियंत्रक बी.के. झावरे, ठाणे जिल्ह्याचे सहायक नियंत्रक एफ.एम. इनामदार, अंधेरी विभाहाचे निरीक्षक बी.जी.आण्णापुरे हे सदस्य असतील. ही समिती आधुनिक तंत्रज्ञानामुळे झालेल्या बदलांचा अभ्यास करेल. त्यात खासकरून पेट्रोल व डिझेल डिस्पेंन्सिंग युनिटची पडताळणी, फेरपडताळणी व मुद्रांकन करताना अवलंबणारी कार्यपद्धतीचा अभ्यास केला जाईल. शिवाय संपूर्ण अहवाल २९ जूनपर्यंत सादर करेल.