डहाणू : येथील चिंचणी, मांगेलवाड्यात गुरुवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास हरेश्वर दवणे (४५) यांची त्यांचाच अल्पवयीन मुलगा धनंजय दवणे (१६) याने प्रेम प्रकरणातून वडील झोपेत असताना डोक्यात मोठा दगड घालून निर्घृण हत्या केली. वानगाव पोलिसांनी धनंजय यास तत्काळ अटक केली आहे.डहाणूच्या चिंचणी, मांगेलवाडा येथील भरवस्तीत हरेश्वर हे कामावरून येऊन घरात झोपले असताना त्यांचा मुलगा धनंजय याने आपल्या वडिलांनी प्रेम प्रकरणास विरोध करून मारल्याच्या रागातून मोठा दगड आणून त्यांच्या डोक्यात टाकला आणि संशय येऊ नये म्हणून दरवाजा लावून क्रिकेट खेळायला निघून गेला. संध्याकाळी मयत हरेश्वरची पत्नी घरी आल्यानंतर पती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांनी पाहिले. याबाबत, तत्काळ वानगाव पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर तपास सुरू करून २४ तासांत धनंजयला अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अरुण फेगडे करीत आहेत.
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध - शिवाजीराव पाटील
By admin | Updated: August 23, 2015 01:29 IST