शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीची कामे करण्याची नोटीस मागे घेण्याची आयोगावर नामुष्की; धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 14:05 IST

केंद्रीय निवडणूक आयोग नोटीस मागे घेत असल्याने मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने धर्मादाय आयुक्तांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली.

मुंबई : धर्मादाय आयुक्त कार्यालयातील १६ कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे करण्यासंदर्भात बजावलेल्या सर्व नोटीस मागे घेत आहोत, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली.

केंद्रीय निवडणूक आयोग नोटीस मागे घेत असल्याने मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने धर्मादाय आयुक्तांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली. गेल्यावर्षी, गेल्या महिन्यात आणि या महिन्याच्या सुरुवातीला राज्य सरकार, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांनी धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयातील १६ जणांना निवडणुकीच्या कामासाठी पत्र पाठविले. त्याला धर्मादाय आयुक्तांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. 

निवडणूक कामांसाठी कर्मचाऱ्यांची मागणी केली जाऊ शकते. मात्र, अधिकृत अधिकारीच तशी मागणी करू शकतो, असे न्यायालयाने म्हटले. या प्रकरणात निवडणूक अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांच्या मागणीसंदर्भात पत्र पाठविले आहे. अशी मागणी करण्याचे अधिकार निवडणूक अधिकाऱ्याला देण्याचे अधिकार राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना कायद्याच्या कोणत्या तरतुदीअंतर्गत बहाल करण्यात आले आहेत, ते आम्हाला दाखवा, असे निर्देश गेल्या सुनावणीत न्यायालयाने केंद्रीय निवडणूक  अधिकाऱ्याला दिले होते. मात्र, मंगळवारच्या सुनावणीत निवडणूक आयोगाने आपण नोटीस मागे घेत असल्याचे सांगितल्याने न्यायालयाने याचिका निकाली काढली.

६३ कर्मचाऱ्यांची कामातून सुटकाआयोगाने नोटीस बजावल्याने १३२ कर्मचाऱ्यांपैकी ६३ जण कर्तव्यावर रुजू झाले. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामे खोळंबली आहेत, असे याचिकादारांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. ६३ कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक