शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आयोग कुणालाही घाबरत नाही

By admin | Updated: May 9, 2014 01:53 IST

वाराणशीतील मोदींच्या सभेला परवानगी नाकारण्यावरून भाजपाकडून होत असलेल्या चौफेर हल्ल्याची अजिबात पर्वा न करता निवडणूक आयोगाने गुरुवारी आपल्यावरील पक्षपातीपणाचा आरोप फेटाळून लावला.

 नवी दिल्ली : वाराणशीतील मोदींच्या सभेला परवानगी नाकारण्यावरून भाजपाकडून होत असलेल्या चौफेर हल्ल्याची अजिबात पर्वा न करता निवडणूक आयोगाने गुरुवारी आपल्यावरील पक्षपातीपणाचा आरोप फेटाळून लावला. कोणतीही व्यक्ती, राजकीय पक्ष अथवा संस्थेला न घाबरता आम्ही आमचे काम चोखपणे बजावत असतो, असे ठणकावून सांगत आयोगाने मोदींच्या सभेला परवानगी न देण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. वाराणशीतील घडामोडींवरून बुधवार संध्याकाळपासून झालेल्या गहजबानंतर मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत यांनी घाईघाईत बोलावलेल्या पत्रपरिषदेत आयोगाची भूमिका स्पष्ट केली. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या रॅलीला परवानगी नाकारण्याच्या वाराणशीचे निवडणूक अधिकारी प्रांजल यादव यांच्या निर्णयाचे समर्थन करताना संपत म्हणाले, यादव यांचा हा निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्यावर आधारित होता. आयोग आपले काम करताना कुणालाही घाबरत नाही. आयोग पक्षपाती नाही. यादव यांना पदावरून हटवण्याची भाजपाची मागणी अनुचित आहे. पत्रपरिषदेला संपत यांच्यासोबत अन्य दोन्ही निवडणूक आयुक्त हजर होते. आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करणार्‍या भाजपाला ठणकावताना संपत म्हणाले, त्यांनी काही गंभीर आणि निराधार आरोप केले आहेत. राजकीय पक्षांनी अधिक परिपक्वता दाखवायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला. संबंधित स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी आणि त्यांच्या चमूने सुरक्षेशी निगडित असलेल्या व्यावसायिकांच्या सल्ल्यावर विचार केल्यानंतरच हा निर्णय घेतला होता आणि आयोगाने हा निर्णय बदलण्याची अजिबात आवश्यकता नव्हती, असे संपत म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

भाजपा व अन्य पक्षांनी काही निवडणूक अधिकार्‍यांची बदली करण्याची मागणी केली आहे. त्याकडे लक्ष वेधले असता संपत म्हणाले, अशा लहानसहान तक्रारींच्या आधारावर आम्ही अधिकार्‍यांची बदली करीत नसतो. आम्ही आमच्या पातळीवर अशा तक्रारींचा तपास करतो आणि तक्रार खरी असेल तरच अधिकार्‍यांची बदली करतो.