शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी नागरिकाला देश सोडण्याचा आदेश

By admin | Updated: February 10, 2017 04:50 IST

२००७ मध्ये देशामधून बाहेर पाठवलेला पाकिस्तानी नागरिक वसीम-उर-रेहमान शहा पुन्हा देशात परतल्याने उच्च न्यायालयाने त्याला दहा दिवसांत देश सोडण्याचा आदेश दिला.

मुंबई : २००७ मध्ये देशामधून बाहेर पाठवलेला पाकिस्तानी नागरिक वसीम-उर-रेहमान शहा पुन्हा देशात परतल्याने उच्च न्यायालयाने त्याला दहा दिवसांत देश सोडण्याचा आदेश दिला. त्यानंतर तो देशात दिसल्यास पोलिसांनी त्यावर कारवाई करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.पाकिस्तानच्या वसीम-उर-रेहमान शहाला २००७ मध्ये भारतातून पाकिस्तानात पाठवण्यात आले. मात्र २०१० मध्ये त्याने पुन्हा देशात प्रवेश मिळवला. नोव्हेंबर २०१६ मध्ये त्याच्या व्हिसाची मुदत संपल्याने केंद्र सरकारने त्याला देश सोडण्याचा आदेश दिला. त्याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या आदेशाला स्थगिती दिली. आता पुन्हा मुदत संपल्याने त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. आजोबा मूळचे भारतीय असल्याने आपल्यालाही भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. भारताचे नागरिकत्व मिळेपर्यंत आपल्याला भारतात राहण्याची परवानगी द्यावी व पोलिसांना आपल्याविरुद्ध कारवाई न करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी वसीम याने केली आहे.मात्र केंद्र सरकारने वसीमचे आजोबा भारतीय असले तरी तो भारतीय नसल्याने त्याला भारताचे नागरिकत्व देण्यास नकार दिल्याचे खंडपीठाला सांगितले. कायद्यांतर्गत आवश्यक असलेल्या बाबी वसीम याने पूर्ण न केल्याने सरकारने त्याला नागरिकत्व दिलेले नाही, असे केंद्र सरकारने खंडपीठाला सांगितले.उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा युक्तिवाद ग्राह्य धरत वसीम याला भारतात राहण्याचा अधिकार नाही, असे म्हणत त्याला दहा दिवसांत देश सोडण्याचा आदेश दिला. दरम्यानच्या काळात त्याला दररोज भांडुप पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे निर्देश दिले. वसीम याच्याबरोबर त्याची पत्नीही असल्याने तिलाही देश सोडावा लागणार आहे. वसीमचे आजोबा सुफी संत असल्याने त्यांची जागा चालवण्यासाठी तो इथे आल्याचे त्याने याचिकेत म्हटले आहे. ‘माझ्या आजोबांनी येथे अनेक दर्गे बांधले. त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात मला वारसदार केले आहे. त्यामुळे त्यांचे काम पुढे चालवण्यासाठी मला भारताचे नागरिकत्व द्यावे,’ असे वसीम याने याचिकेत म्हटले आहे.तर त्याच्या याचिकेत मध्यस्थी करणाऱ्या अर्जदाराने वसीम दर्ग्यांमधून भारतविरोधी भाषणे देऊन लोकांना चिथावत असल्याचे खंडपीठाला सांगितले. वसीम दर्ग्यांची जागा बळकावण्यासाठी येथे आला आहे. येथील दर्ग्यांच्या कामात व्यत्यय आणत आहे. तसेच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मध्यस्थी अर्जदाराने अर्जात नमूद केले आहे.२०१२ मध्ये वसीम राज्य सरकारच्या परवानगीशिवाय लाल दिव्याची गाडी घेऊन फिरत असल्याने चांगलाच चर्चेत आला होता. उच्च न्यायालयाने त्या वेळीही त्याच्यावर कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. (प्रतिनिधी)