शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक : जगाच्या तुलनेत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 05:14 IST

इटली, इराण, अमेरिकेच्या तुलनेत भारताला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात बºयाच अंशी यश आले. याचे श्रेय आरोग्य संघटनेने भारताने वेळीच धाडसी निर्णय घेत केलेल्या लॉकडाऊनला दिले.

मुंबई : गेल्या काही दिवसांत भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आता कोरोना भारतात प्रचंड थैमान तर घालणार नाही ना, अशी भीती भारतीयांना आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे चीननंतर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे होणाºया मृत्यूंची संख्या ही इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. याचे श्रेय जागतिक आरोग्य संघटनेने भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना दिले आहे.

कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३,२७० आहे. आता कोरोनावर नियंत्रण मिळविल्याचा दावा चीनने केला असला, तरी नुकतेच तिथे एकाच दिवशी ३६ नवे बाधित आढळले आहेत. कोरोनामुळे इराण, इटली, अमेरिका, स्पेनसह इतर युरोपियन देशांत भीषण परिस्थिती आहे. इटलीचा विचार केल्यास येथे ९ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. ८ मार्चपर्यंत येथे कोरोनाचे ७,३७५ रुग्ण होते, तर ३६६ जणांचा मृत्यू झाला होता. लॉकडाऊननंतर १७ मार्च रोजी येथे ३१,५०६ रुग्ण आढळले, तर २,५०३ जणांना जीवास मुकावे लागले. म्हणजे अवघ्या ९ दिवसांत २४,१३१ रुग्ण वाढले. मृतांची संख्याही तब्बल २,१३७ने वाढली.

इटली, इराण, अमेरिकेच्या तुलनेत भारताला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात बºयाच अंशी यश आले. याचे श्रेय आरोग्य संघटनेने भारताने वेळीच धाडसी निर्णय घेत केलेल्या लॉकडाऊनला दिले. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस एडरेनोम गैबरेयेसेस यांनी यासाठी भारताची प्रशंसा केली. तर संसर्गजन्य आजारांवर मात करण्याची भारताची चांगली क्षमता असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक जे. रेयान यांनी व्यक्त केले. मात्र कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या ही धोक्याची घंटा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याकडे लक्ष वेधले आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताने वेळेत उपाययोजना राबविल्या. लॉकडाऊनमुळे कम्युनिटी ट्रान्समिशन जास्त प्रमाणात दिसत नाही. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि सरकारी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले. यासाठी एक दिवस टाळ्या वाजवून काही होणार नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. म्हणूनच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश येण्यासाठी भारतीयांनीही परिस्थितीचे (शारीरिक, सामाजिक, आर्थिक) गांभीर्य लक्षात घेऊन योग्य खबरदारी घ्यायला हवी.

अहवाल काय सांगतो?अमेरिकेतील न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या डिपार्टमेंट आॅफ बायो मेडिकल सायन्सेसने केलेल्या संशोधनानुसार बीसीजी लसीकरण करणाºया देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रभाव कमी दिसून येतो. बीसीजी म्हणजेच बेसिलस कार्मेट ग्युमिन्ग. मात्र, क्षयरोग हा तितकासा जीवघेणा राहिला नसल्याने अनेक प्रगत देशांमध्ये बीसीजीचे लसीकरण केले जात नाही. ज्या देशांनी बीसीजीचे लसीकरण अनेक वर्षांपूर्वी सोडले आहे तेच देश कोरोनाला जास्त बळी पडत आहेत, असे या अहवालात नमूद आहे. या अहवालातील निष्कर्षानुसार, लसीकरण मोहिमेत बीसीजी लस बंधनकारक असलेल्या भारतात यामुळेच कोरोनाचा प्रभाव कमी दिसून येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या