शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

सोयी-सुविधा-सवलतींपासून नंदीवाले समाज दूरच

By admin | Updated: October 31, 2016 01:22 IST

आधुनिक काळात घराघरात पोहोचलेली करमणूक व्यवस्था यामुळे नंदीकडून भविष्य कोणी ऐकत नाही.

सतीश सांगळे, कळस : शिक्षणाच्या प्रचार व प्रसारामुळे वाढलेली विज्ञाननिष्ठा आणि आधुनिक काळात घराघरात पोहोचलेली करमणूक व्यवस्था यामुळे नंदीकडून भविष्य कोणी ऐकत नाही. त्यामुळे नंदीवाले समाजाचा भविष्य सांगण्याचा परंपरागत व्यवसाय लोप पावत आहे. गावकुसाबाहेर भटकंती करणारा हा समाज आता स्थिर होत आहे. शेती, शेतमजुरी करून उदरनिर्वाह केला जात आहे. मात्र, गावगाड्यातून आजही सोयी-सुविधा-सवलती व घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही, अशी खंत काझड (ता. इंदापूर) येथील नंदीवालेवस्तीमधील नागरिकांनी व्यक्त केली. या ठिकाणी सुमारे १५ कुटुंबे गेल्या ४० वर्षांपासून राहत आहेत. ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय’ हे गाणं महाराष्ट्राला सुपरिचित आहे. गाण्यातला भोलानाथ म्हणजेच नंदीवाल्यांचा नंदी. शिंगांना व पायात रंगीत सुती गोंडे बांधलेले, गळ्यात घंटांची माळ आणि पाठीवर रंगीबेरंगी व सुंदर नक्षीकाम केलेली शाल अशा सजवलेल्या वेशातला नंदी लक्ष वेधून घेतो. भविष्य जाणून घेऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी किंवा नकारार्थी मान हलवून देतो, हे चित्र आपण अनेक वेळा अनुभवले आहे. नंदी शंकर महादेवाचा भक्त व सेवक असल्याची भावना असल्यामुळे लोकांच्या मनात नंदीवर श्रद्धा व त्याच्या भविष्यकथनाबद्दल आदर होता. याच श्रद्धा व आदरापोटी लोकांनी स्वखुशीने दिलेली दक्षिणा हेच नंदीवाल्या जमातींच्या उपजीविकेचे परंपरागत साधन होते. दिवाळी सण होताच नंदीवाले आपापला नंदी घेऊन खेळ दाखवायला राज्यात, राज्याबाहेरही जात असत. दिवाळीनंतर बाहेर पडल्यानंतर ते शिवरात्रीला परत येत होते. मात्र, सध्या या नंदीबैलाच्या खेळाचे आकर्षण घटले आहे.उपजीविकेचे साधन कमजोर झाले असून अभावग्रस्त आयुष्य जगावे लागत आहे. नंदीवाले जमात आंध्रातून दोन टप्प्यांत महाराष्ट्रात आली. या सर्वांची मातृभाषा तेलुगू आहे. यांना मराठी भाषा चांगल्या तऱ्हेने बोलता येतात. भटकेपणामुळे यांच्यात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असले तरी नवीन पिढीतील यांची बरीच मुले-मुली शाळा शिकत आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात वडापुरी येथे दर तीन वर्षांनी या सर्व नंदीवाले जमातीची मोठी यात्रा भरते. मुख्यत: घरोघर फिरून छोटे छोटे कृत्रिम शोभिवंत दागिने, अशुभ किंवा वाईट गोष्टींपासून मुला-बाळांचे संरक्षण करणारे ताईत, बैलाच्या गळ्यात बांधण्यासाठी आवश्यक कवड्यांच्या आणि मोठ्या मण्यांच्या माळा, सुया-दाभण-बिब्बा, फणी-कंगवे-रिबिन आदी कटलरी वस्तू विक्रीचे काम आजही करतात.>...आजही राहायला पक्के घर नाहीआमचा समाज साधारण १९७० मध्ये येथे आला. गावोगावी भटकंती करीत असताना येथे मूळ चार कुटुंबे स्थिर झाली. पवार व वाघमोडे आडनावे येथे आहेत. आता पंधरा कुटुंबे आहेत. मात्र, आजही १३ कुटुंबांना राहायला पक्के घर नाही. शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. पारंपरिक व्यवसाय आम्ही करीत नाही. मात्र, महिला कटलरी व्यवसाय फिरून करतात, थोडी शेती आहे. त्यावर आम्ही उदरनिर्वाह करीत आहे, अशी व्यथा गणेश पवार याने मांडली.