शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेच्या तोंडावर सात जिल्ह्यांतील महाविद्यालये ठप्प; मुंबई, पुणे, मराठवाड्यात नियमितपणे तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 03:09 IST

विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या बारा दिवसांपासून राज्यात प्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, ठाणे, वाशिम आणि यवतमाळमधील महाविद्यालयात तास होत नसल्याने तेथील शिकविणे बंद आहे.

- संतोष मिठारीकोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या बारा दिवसांपासून राज्यात प्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, ठाणे, वाशिम आणि यवतमाळमधील महाविद्यालयात तास होत नसल्याने तेथील शिकविणे बंद आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि मराठवाड्यात आंदोलनाचा फारसा परिणाम झाला नसून, येथील महाविद्यालयात नियमितपणे तास होत आहेत.महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स आॅर्गनायझेशनच्या (एम्फुक्टो) नेतृत्वाखाली राज्यातील प्राध्यापकांनी हे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी एम्फुक्टो आणि उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे एम्फुक्टोने आंदोलनाची तीव्रता वाढविली. या आंदोलनाला तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनीही पाठिंबा दिला आहे.कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील अनुदानित महाविद्यालयांतील १२४३ प्राध्यापक आंदोलनात सहभागी आहेत. या जिल्ह्यांतील ८० टक्के महाविद्यालयांमध्ये तास होत नाहीत. नाशिक जिल्ह्यातील ८०० प्राध्यापक आंदोलनात सहभागी आहेत. अहमदनगरमधील प्राध्यापक आपआपल्या महाविद्यालयासमोर रोज निदर्शने करतात. वाशिम आणि यवतमाळमधील प्राध्यापकांनी ‘खडूफळा बंद’ आंदोलन पुकारले आहे. ठाणे शहरातील ८० टक्के प्राध्यापक आंदोलनात सहभागी असल्याने येथील महाविद्यालयात वर्ग भरत नाहीत. मराठवाड्यात मोर्चा, सामूहिक रजा आंदोलनाद्वारे ते निषेध व्यक्त करीत आहेत. मुंबई विद्यापीठातर्फे पुनर्परीक्षार्थीं विद्यार्थ्यांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. पुणे शहरात आंदोलनाला अत्यल्प प्रतिसाद आहे. पुणे ग्रामीण, नगर भागात काही परिणाम जाणवत आहे.या ठिकाणी एक-दोन दिवसांचे आंदोलनचंद्रपूर जिल्ह्यात ‘बेमुदत कामबंद’ आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शासनाचा निषेध करण्यात आला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत असलेल्या नंदुरबार, धुळे आणि जळगावमध्ये एक ते दोन दिवस धरणे आंदोलन करण्यात आले. गडचिरोलीमध्ये दि. २५ आणि २६ सप्टेंबरला निदर्शने करण्यात आली. त्यानंतर, नियमितपणे तासिका आणि महाविद्यालयांचे कामकाज सुरू आहे.संघटनेला मुख्यमंत्री चर्चेसाठी बोलवित नाहीत. त्यामुळे आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या नुकसानाला राज्य सरकार जबाबदार आहे. बहुतांश महाविद्यालयांतील अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यापीठांकडे केली जाणार आहे.- प्रा. डॉ. सुभाष जाधव, उपाध्यक्ष, ‘एम्फुक्टो’

टॅग्स :examपरीक्षा