शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन विद्यार्थी असुरक्षितच

By admin | Updated: April 5, 2017 01:23 IST

हिंजवडी आयटी पार्क, तळवडे सॉफ्टवेअर पार्कमध्ये काम करणाऱ्या तरुणींवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क, तळवडे सॉफ्टवेअर पार्कमध्ये काम करणाऱ्या तरुणींवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या. तळवडे येथे अंतरा दास या अभियंता तरुणीच्या खुनाच्या घटनेपाठोपाठ हिंजवडीत रसिला राजू या अभियंता तरुणीचा तेथील रखवालदाराने गळा आवळून खून केला. या घटनेमुळे उद्योगनगरी परिसरातील तरुणींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर पोलिसांनी महिला सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या. मात्र, या योजना अपुऱ्या पडत असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनावरून दिसून येत आहे. ताथवडेतील ताज्या घटनेने महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये घबराटीचे वातावरण आहे. हिंजवडीत रसिला ओपी या तरुणीचा रखवालदाराने गळा आवळून खून केल्याच्या घटनेनंतर पुणे शहर पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर दखल घेतली. आयटी कंपन्यांच्या परिसरात पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी स्वत: महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भातील जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबवला. आयटी कंपन्यांमधील तरुण-तरुणींशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना सुरक्षेसंबंधी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. कंपनी व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली. एवढेच नव्हे तर या भागासाठी ‘बडी कॉप’ सेवा सुरू केली.या परिसरात पोलिसांची गस्त वाढवली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी तातडीची मदत उपलब्ध होण्याकरिता प्रतिसाद अ‍ॅपचा वापर करण्याचे मार्गदर्शन केले. पोलिसांच्या वतीने या उपाययोजना केल्यानंतरही याच भागात महाविद्यालय परिसरात अश्विनी या तरुणीवर प्राणघातक हल्ला झाला. ताथवडेतील बालाजी महाविद्यालयात शिकणाऱ्या अश्विनी बोदकुरवार हिच्यावर हल्ला झाल्याच्या घटनेने पुण्यात नोकरीसाठी अथवा शिक्षणासाठी आलेल्या तरुणी सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)हिंजवडीत दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या आयटी अभियंता तरुणीच्या खून प्रकरणात त्याच कंपनीत काम करणाऱ्या रखवालदार तरुणाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. ताथवडेतील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अश्विनी या तरुणीवर प्राणघातक हल्ल्याची घटना नुकतीच घडली. या दोन्ही घटनांमध्ये बाहेरील गुन्हेगारांचा सहभाग नाही. परिचयाच्या व्यक्तींनी असे कृत्य केले आहे. त्यामुळे अशा घटनांवर नियंत्रणासाठी वेगळ्या स्वरूपाच्या उपाययोजना कराव्या लागतील. - गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त, परिमंडल तीन महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुण-तरुणींनी आपण शिक्षणासाठी दूरवरून आलो आहे, याचे भान ठेवून शिक्षणाला प्राधान्य द्यावे़ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने नियमित गस्त सुरू असते़ तसेच दामिनी पथकाच्या माध्यमातून समुपदेशन केले जाते. तसेच महाविद्यालय परिसर सोडून विद्यार्थ्यांनी निर्जन ठिकाणी जाऊ नये. - संदीप येडे पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, लोणावळा ग्रामीण >लोणावळा : लोणावळ्याजवळील कुसगाव येथील सिंहगड महाविद्यालयात मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी सार्थक वाकचौरे व संगणकीय अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी श्रुती डुंबरे यांचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमांना तत्काळ अटक करून त्यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवा, या मागणीचे निवेदन देण्यासाठी महाविद्यालयातील जवळपास चार ते साडेचार हजार विद्यार्थ्यांनी कॅम्पसप्रमुख प्रज्ञा कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये सिंहगड महाविद्यालय ते शहर पोलीस ठाण्यापर्यंत कँडल मार्च मोर्चा शांततेच्या मार्गाने काढत तपास अधिकारी चंद्रकांत जाधव यांना निवेदन दिले.