शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुन्हा गारवा; मुंबई  १६, तर महाबळेश्वर १५ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 02:45 IST

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, शनिवारी गोवा आणि महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली.

मुंबई :मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा मध्यम स्वरूपाच्या थंडीची लाट दाखल हाेणार आहे. त्याची प्रचिती नागरिकांना शनिवारी आली. शनिवारी मुंबईचे किमान तापमान १६ तर महाबळेश्वरचे १५ अंशांवर नोंदविण्यात आले. सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.४ अंश सेल्सिअस एवढे हाेते.मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, शनिवारी गोवा आणि महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली. मुंबईचे किमान तापमान खाली उतरले असून, ते १६ अंश नोंदविण्यात आल्याने येथील हवेत गारवा निर्माण झाला. राज्यातही किमान तापमानात घट झाली असून पुढील काही दिवसांत यात आणखी घट नोंदविण्यात येईल.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रदूषणाचे प्रमाण वाढले होते,  मुंबईकरांना उन्हाचा झळा सहन कराव्या लागत हाेत्या. 

२० जानेवारीपासून थंडीची मध्यम लाट२० जानेवारीपासून राज्यात पुन्हा थंडीची मध्यम लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ, उत्तर कोकणात थंडीचा प्रभाव राहील. २२ आणि २३ जानेवारी नंतर पुणे, नाशिक येथील पारा १२ अंशाखाली जाण्याची शक्यता आहे. मुंबई आणि परिसरातही किमान तापमानात घट होईल. ते १६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, असे होसाळीकर यांनी सांगितले.राज्यातील शहरांचे शनिवारचे किमान तापमान (अंश सेल्सिअस) -- नाशिक १४.५, पुणे १६, - बारामती १५.९, सातारा १६.७, - महाबळेश्वर १५.८, उस्मानाबाद १५.४, औरंगाबाद १६.७, - माथेरान १६.८, अमरावती १५.५, चंद्रपूर १३.६, गडचिरोली १३.२, गोंदिया ८.४, नागपूर १२.६, वर्धा १४, मुंबई १६.६.

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMumbaiमुंबईMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान