शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात थंडीचा कडाका; विठुरायालाही हुडहुडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 06:24 IST

राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, साक्षात विठुरायालाही हुडहुडी भरली आहे.

पंढरपूर (जि. सोलापूर): राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, साक्षात विठुरायालाही हुडहुडी भरली आहे. या थंडीपासून बजाव व्हावा, म्हणून श्री विठ्ठल व रुक्मिणीच्या मूर्र्तींना काश्मिरी रजई, पश्मिना शाल आणि डोक्याला मुंडासे असा उबदार पोषाख चढविण्यात येत आहे. हे उबदार कपडे होळीपर्यंत घातले जाणार आहेत.चार दिवसांपासून थंडी वाढत चालल्याने प्रक्षाळपूजेनंतर देवाला हे उबदार कपडे परिधान करण्यात येत आहे. रात्री शेजारतीनंतर विठुरायाच्या अंगावरील पोशाख काढून अंग पुसून घेतल्यावर, मूर्तीच्या डोक्यावरील मुकुट काढून तेथे १५० हात लांबीचे हे खास उबदार मुंडासे बांधण्यात येते, तसेच सुती उपरण्याची कानपट्टी बांधण्यात येते. पांढराशुभ्र उबदार शेला डोक्यापासून पायापर्यंत टाकण्यात आल्यानंतर शाल अंगावर टाकून त्यावर खास काश्मिरी रजई घालण्यात येते. देवाला नखशिखांत उबदारपणा जाणवेल, याची खबरदारी घेतली जाते. शेवटी तुळशीहार घालून आरती करून देवाला निद्रेसाठी सज्ज केले जाते. काकड आरतीच्या वेळी मूर्तीवरील उबदार कपडे, तसेच ठेवण्यात येतात.>मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणी मातेस थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी शाल, कानपट्टी, रजई आदी उबदार कपडे घालण्यास सुरुवात केली आहे.>परभणीचा पारा ९.५ अंशांवरपरभणीत थंडीची लाट पसरली असून, रविवारी जिल्ह्याचे किमान तापमान ९.५ अंश सेल्सियस होते. या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे थंडीचे प्रमाणही कमी राहील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, डिसेंबर महिना उजाडताच हुडहुडी भरविणारी थंडी जाणवू लागली आहे.>प्रमुख शहरांतील किमान तापमानपुणे १२़१, जळगाव १३़६, कोल्हापूर १७, महाबळेश्वर १३़९, मालेगाव १३़४, नाशिक ११़४, सांगली १३़९, सातारा १२़१, सोलापूर १६़६, मुंबई २२़५, अलिबाग १९़८, डहाणू १९, उस्मानाबाद १३़९, औरंगाबाद १०़८, परभणी १२़६, अकोला १५, अमरावती १४़८, बुलडाणा १५, ब्रह्मपुरी १४, चंद्रपूर १६, गोंदिया १२़२, नागपूर १२़७, वर्धा १४़५, यवतमाळ १३़़२ अंश सेल्सिअस.