शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

मासेमारी नौकांना सांकेतिक रंग

By admin | Updated: March 14, 2015 05:36 IST

समुद्रातील सागरी सुरक्षा अधिक बळकट व सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने गृहविभागाने पालघर-मुंबईसह सात जिल्ह्यांतील सर्व मासेमारी नौकाना वेगवेगळे

हितेन नाईक, पालघरसमुद्रातील सागरी सुरक्षा अधिक बळकट व सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने गृहविभागाने पालघर-मुंबईसह सात जिल्ह्यांतील सर्व मासेमारी नौकाना वेगवेगळे सांकेतिक रंग (कलर कोड) लावण्याचे आदेश दिले असून २६/११ सारख्या समुद्री मार्गाने होणारे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी उचलण्यात आलेले हे महत्वपूर्ण पाऊल म्हणता येईल. येथील सर्व मच्छीमारांनी त्यांची अंमलबजावणी केली आहे.परकीय नौका सहज ओळखता यावी म्हणून मुंबई शहरातील नौकाना फ्लोरोसंट पिवळा रंग, मुंबई उपनगरासाठी फ्लोरोसंट तपकीरी, ठाणे जिल्ह्यासाठी फ्लोरोसंट निळा, पालघर जिल्ह्यासाठी फ्लोरोसंट जांभळा, रायगड जिल्ह्यासाठी फ्लोरोसंट लाल, रत्नागिरी जिल्ह्यासाठी फ्लोरोसंट गुलाबी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी फ्लोरोसंट नारिंगी रंग निश्चित करण्यात आला आहे. नौकेच्या कडेवरील पेरच्या, बडोद, लाफा इ. वर सहा इंचाच्या कलरपट्टा लावण्याचे आदेश सहा. मत्स्यव्यवसाय संचालक रविंद्र वायडा यांनी संबंधित सहकारी दिले आहेत.आपल्या नौकावरील कलरकोड करण्यास चालढकल करणाऱ्या संस्थाचा २०१५-१६ साठीचा डिझेल कोट्याच्या मंजुरीचा प्रस्तावाची जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाकडून शिफारस केली जाणार नसल्याचे कळविले आहे. पालघर, डहाणू तालुका हा एकेकाळी स्मगलिंगसाठी सोयीचा कि नारा म्हणून ओळखला जात होता तर आज तारापुर अणुउर्जा प्रकल्प, डहाणू थर्मल पॉवर, तारापूर औद्योगिक वसाहत या संस्थांमुळे संरक्षणाच्या दृष्टीने हा भाग अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो. पालघर व डहाणू या दोन्ही तालुक्यांमध्ये सुमारे २ ते ३ हजार मच्छीमार नौका आहेत.