शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

कोणत्याही क्षणी आचारसंहिता, मंत्रालयात लगबग; पहिल्यांदाच लागोपाठ दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक

By दीपक भातुसे | Updated: March 8, 2024 08:21 IST

पहिल्यांदाच अशा प्रकारे एका आठवड्यात सलग दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक होत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्याच्या शेवटी जाहीर होणार असल्याची चर्चा असून त्याचे पडसाद राज्याच्या कारभारावरही  उमटलेले दिसून येत आहेत. आचारसंहिता लागायला थोडेच दिवस शिल्लक असल्याने मंत्रालयात निर्णय घेण्याचा सपाटा सुरू आहे. त्या अनुषंगाने पुढील आठवड्यात सोमवार ११ आणि मंगळवार १२ मार्च असे सलग दोन दिवस राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे एका आठवड्यात सलग दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक होत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

आतापर्यंत झाल्या ६६ मंत्रिमंडळ बैठका एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर स्थापन झालेल्या सरकारच्या आतापर्यंत ६६ मंत्रिमंडळ बैठका झाल्या असून, त्यात ५००च्यावर निर्णय घेण्यात आले आहेत.  पुढील आठवड्यात सलग दोन दिवस होणाऱ्या बैठकांनंतर हा आकडा ६८ वर पोहोचेल.

लोकप्रिय निर्णयांची शक्यता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे चालू आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक झालेली नाही. त्यात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सरकारला अनेक लोकप्रिय निर्णय घ्यायचे आहेत, शिवाय आमदारांच्या मतदारसंघातील अनेक प्रलंबित निर्णय मार्गी लावायचे आहेत. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वीचा अनुभव पाहता निवडणुकीपूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांची संख्या मोठी असते. त्यामुळे या दोन दिवसांच्या बैठकांमधून किती निर्णय घेतले जातात याबाबत उत्सुकता आहे.

जीआर जारी करण्याची धावपळ आचारसंहितेपूर्वी शासन निर्णय (जीआर) जारी करण्याची लगबग मंत्रालयात सुरू आहे. अनेक योजनांसाठी किंवा सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी देण्याचे निर्णय घेतले आहेत. मात्र त्याचे शासन निर्णय जारी झालेले नाहीत. शासन निर्णय जारी झाल्याशिवाय प्रत्यक्ष निधी मिळत नाही. त्यामुळे असे प्रलंबित शासन निर्णय काढण्याची घाई सध्या सुरू आहे. दुसरीकडे मंत्रालयात आणि मुख्यमंत्री कार्यालयात अभ्यागतांची गर्दीही वाढलेली पाहायला मिळते आहे. प्रामुख्याने बदल्या आणि निधीसाठी लोकांची गर्दी मंत्रालयात दिसत आहे. काही विभागात तर फाईल तयार होण्याआधी जीआर काढण्याची घाई सुरू असल्याचे दिसून आले. आधी जीआर काढा, फाईलवर सही होणारच आहे, असा प्रकार सुरू आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकCode of conductआचारसंहिता