नारायण जाधव - ठाणो
राज्यातील अनेक जिल्ह्यांची तहान भागवून वीजनिर्मितीत महत्त्वाचे योगदान देणा:या कोयना खो:यातील पाच गावांच्या पुनर्वसनास राज्य शासनाने ठाणो जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील 242़39क् हेक्टर वनजमीन देण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने गेल्या महिन्यात मान्यता दिल्यावर राज्याच्या महसूल व वन विभागाने याबाबतचे आदेश काढले आहेत़
कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होणा:या या वनजमिनीत भिवंडी तालुक्यातील एकसाल गावाच्या हद्दीतील 196़7क्8 हेक्टर राखीव वनांचा आणि सागावच्या हद्दीतील 45़682 हेक्टर संरक्षित वनांचा समावेश आह़े यात कोयना खो:यातील रवंडी, आडोशी, मालडोशी, कुसापूर आणि खिरखिंडी या पाच गावांचा समावेश आहे.
राज्याच्या नागपूर येथील प्रधान वनसंरक्षकांनी केंद्र सरकारला केलेल्या पत्रव्यवहारानुसार हे पुनर्वसन करण्यात येणार आह़े हे पुनर्वसन करताना जंगलातील वनसंपत्तीस हानी पोहोचणार नाही, याबाबत केंद्र सरकारने घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार पुनर्वसन करावयाचे आह़े
च्राज्यातील रायगड आणि ठाणो जिल्ह्यांतील अनेक भागांत कोयना खो:यातील बाधित गावांचे पुनर्वसन करण्यात आले आह़े मात्र, ठाणो आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांत मुंबई आणि नवी मुंबई या शहरांची तहान भागवणारी अनेक धरणो असून, या धरणांखाली बाधित अनेक गावपाडय़ांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही़ या धरणग्रस्तांचा संघर्ष सुरू असून, त्याकडे ठाणो जिल्ह्यातील राज्यकत्र्यानी मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसत आह़े