मुंबई : भाजपा शिवसेनेत भांडणे लागावीत म्हणून राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा देऊ केला होता, मात्र त्याचा स्वत:च्या सोयीचा अर्थ काढत काँग्रेसने कायम आमच्यावर टीका केली, पण या जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत काँग्रेसने उस्मानाबाद व रायगड या दोन जिल्ह्यात शिवसेनेसोबत युती केली आहे, हा कसला समझोता आहे , असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आम्ही उस्मानाबाद, रायगडमध्ये जागा देण्यास तयार असतानाही त्यांनी शिवसेनेचा पदर धरला. आता रायगडमध्ये एकाच पोस्टरवर काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आहेत. काँग्रेसच्या उमेदवारला विजयी करा, असे आवाहन करत अवजड खात्याचे मंत्री अनंत गीते फिरत आहेत.
रायगड, उस्मानाबादमध्ये काँग्रेसची सेनेसोबत युती
By admin | Updated: February 15, 2017 00:44 IST